Govind Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Govind Milk Subsidy : ‘गोविंद मिल्क’च्या १३ हजार शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ

Milk Subsidy : गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या दूध डेअरीच्या माध्यमातून या संस्थेच्या दूध उत्पादकांना १३ कोटी १५ लाख रुपये इतके अनुदान दूध उत्पादकांना मिळाले आहेत.

Team Agrowon

Satara News : राज्य शासनाने ११ जानेवारी ते २० मार्च २०२४ या कालावधीसाठी राज्यातील दूध उत्पादकांना जाहीर केलेल्या पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे विशेष अनुदान योजना नुकतीच कार्यान्वित करण्यात आली.

या योजनेमध्ये जिल्ह्यातील गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या दूध डेअरीच्या माध्यमातून या संस्थेच्या दूध उत्पादकांना १३ कोटी १५ लाख रुपये इतके अनुदान दूध उत्पादकांना मिळाले आहेत. यापैकी बहुतांशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे व उर्वरित रक्कम लवकरच जमा होणार आहे.

या अंतर्गत गोविंद मिल्कच्या १३ हजार १५२ दूध उत्पादकांना या योजनेचा लाभ मिळाला असून गोविंदाच्या एकूण संकलनापैकी ७४ टक्के दूध या योजनेमध्ये अनुदानासाठी पात्र ठरले. विशेष म्हणजे शासनाने पूर्वी जाहीर केलेल्या कालावधीमध्येच बहुतांश काम गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या वतीने अतिशय योजनाबद्ध रीतीने पूर्ण करण्यात आले.

ही योजना जाहीर झाल्यानंतर त्यातील अटी व नियम पाहता राज्यातील ती दूध उत्पादक या योजनेसाठी पात्र होऊ शकतील अशी शंका निर्माण होत असताना गोविंद मिल्कच्या जास्तीत जास्त दूध उत्पादकांपर्यंत या योजनेचा लाभ कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचवला पाहिजे.

ही भूमिका घेऊन गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचे संस्थापक संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार दूध संकलन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन ही क्लिष्ट प्रक्रिया वेळेत पूर्ण करून इतर संस्थांनाही या योजनेचा लाभ घेण्याचा मार्ग विस्तृत करून दिला. जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटे, अतुल रासकर श्री श्री. धुर्गुडे, श्री मोहिते, श्री. पवार यांचे सहकार्य मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT