Farmer Loan Waive
Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : पाच हजार शेतकऱ्यांना ‘प्रोत्साहन अनुदाना'चा लाभ

Anil Jadhao 

Nandurbar News : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme) अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील पाच हजार ७५५ शेतकऱ्यांना २६ कोटी १९ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात १२ हजार ७४ पात्र खातेधारक असून, पोर्टलवर सात हजार ११४ लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. सहा हजार ५०७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे.

आतापर्यंत पाच हजार ७५५ शेतकऱ्यांना २६ कोटी १९ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. त्यात नंदुरबार तालुक्यातील एक हजार ६८२ शेतकरी (सात कोटी ६३ लाख ९५ हजार ९७९), शहादा दोन हजार ९४७ शेतकरी (१३ कोटी ९१ लाख २२ हजार ६८१), नवापूर ५७० शेतकरी (दोन कोटी २० लख १० हजार ३०९), तळोदा ३६० शेतकरी (एक कोटी ७४ लख ९३ हजार ४४०), अक्कलकुवा ५२ शेतकरी (२२ लाख ८४ हजार १८२ रुपये) आणि अक्राणी तालुक्यातील १३२ शेतकऱ्यांना ४० लाख २३ हजार ९४४ रुपये लाभ देण्यात आला.

शेती व शेतीशी निगडित कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात.

२०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षांत राज्यातील विविध भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. राज्याच्या काही भागांत अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षांत शेती निगडित कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे आणि त्याला शेतीकामांकरिता नव्याने पीककर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या.

ही परिस्थिती विचारात घेऊन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

...अशी होती योजना

या योजनेला ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना संबोधण्यात येते. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी वर्ष २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यात येतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT