Bedana  Agrowon
ॲग्रो विशेष

Bedana News : बेदाणे लिलाव केंद्राला टाळे

Vashi Market Committee : सुका मेवा बाजारपेठेची व्याप्ती वाढवण्यासाठी; तसेच शेतकऱ्यांना आणखीन एक पर्याय उपलब्ध होईल या उद्देशाने मुंबई कृषी उत्पन्न मसाला बाजारात बेदाणे लिलाव केंद्र सुरू करण्यात आले होते.

Team Agrowon

Vashi News : सुका मेवा बाजारपेठेची व्याप्ती वाढवण्यासाठी; तसेच शेतकऱ्यांना आणखीन एक पर्याय उपलब्ध होईल या उद्देशाने मुंबई कृषी उत्पन्न मसाला बाजारात बेदाणे लिलाव केंद्र सुरू करण्यात आले होते.

मात्र, एपीएमसीमध्ये अजूनही बेदाण्याला ग्राहक नसल्याने विक्री होत नाही. परिणामी, ग्राहकांअभावी बेदाणे लिलाव केंद्र बंदच आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ आधी मुंबईमध्ये स्थित होती. कालांतराने बाजारपेठेची व्यापकता वाढवण्यासाठी नवी मुंबईत स्थलांतर करण्यात आले. तेव्हापासून एपीएमसी बाजार समितीची वार्षिक उलाढाल वाढत आहे.

बेदाणे विक्री केंद्र सुरू केल्यास आर्थिक भर पडेल; तसेच शेतकऱ्यांना आणखीन एक पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे मार्चमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बेदाणे लिलाव केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले.

सोलापूर, नाशिक, धुळे, सांगली, सातारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. द्राक्षांची परदेशात निर्यातही केली जातात. या द्राक्षांवर प्रक्रिया करून बेदाणेही तयार केले जातात. यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते.

शेतकऱ्यांना बेदाणे विक्रीसाठी सोलापूर आणि सांगली येथे बाजारपेठ उपलब्ध आहे. अजून एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी; तसेच त्यांच्या मालाला चांगला हमीभाव मिळावा यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणे लिलाव केंद्र सुरू करण्यात आले होते. परंतु बेदाण्याचे भाव कमी असून, सध्या प्रति किलो १२०-१८० रुपयांनी विक्री होत आहे.

शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव मिळण्याची अपेक्षा होती; मात्र तोही मिळत नाही. तसेच ग्राहक नसल्याने बेदाण्याची बाजारात विक्रीही होत नाही. त्यामुळे सध्या तरी हे बेदाणे लिलाव केंद्र बंद आहे.
विजय भुता, संचालक, मसाला बाजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT