Ashadhi Wari 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांच्या सेवेत कुचराई केल्यास कारवाई

Palakhi Sohala 2025 : सर्व संतांच्या पालखी मार्गावर वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी दक्ष रहा. सेवा म्हणून काम करा. पालखी मार्गावर ज्यांची नव्याने नियुक्ती आहे, त्यांनी पूर्ण काम समजून घ्यावे.

Team Agrowon

Solapur News : सर्व संतांच्या पालखी मार्गावर वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी दक्ष रहा. सेवा म्हणून काम करा. पालखी मार्गावर ज्यांची नव्याने नियुक्ती आहे, त्यांनी पूर्ण काम समजून घ्यावे. कोणी कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई करू. तसेच याप्रकरणी पंचायत विस्तार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी

सोमवारी (ता. २३) जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी सर्व संतांच्या पालखी मार्गावरील संपर्क अधिकारी, नोडल अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी जिल्ह्यातील १७२ किलोमीटर अंतराच्या पालखी मार्गावरील सर्व ग्रामसेवकांना स्पष्ट सूचना दिल्या.

प्रमुख संतांच्या पालखीचे स्वागत व नियोजनासाठी जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांना संपर्क अधिकारी म्हणून नेमले आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांनी दररोज दर चार तासाला कामाचा आढावा घ्यावा. ज्येष्ठ वारकरी, लहान मुले, स्तनदा माता यांची काळजी घ्या.

पालख्यांचे प्रस्थान होईपर्यंत स्वच्छतेची खबरदारी घ्या. पिण्याच्या पाण्याचे नमुने दोन ठिकाणांहून वेळेत तपासा. प्रत्येक दिशादर्शक फलकासाठी रंगनिश्चिती केली आहे. त्यानुसार ते असतील याची दक्षता घ्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पुराची चिन्हे, काळजी घ्या

यंदा पावसामुळे पालखी मार्गावरील नदीकाठच्या गावांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर काळजी घ्या. पालखी तळावर पालखी येण्याच्या प्रमुख मार्गासह भाविकांच्या रहदारीचा मार्ग, उभे व आडवे रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी जाण्याच्या मार्गावर चिखल होणार नाही, याची दक्षता घ्या, अशी सूचना जंगम यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT