Financial Fraud Agrowon
ॲग्रो विशेष

Barshi Trader Fraud: बार्शीतील अडत व्यापाऱ्याला ८ लाखांचा गंडा: फसवणुकीचा प्रकार उघड!

Financial Scam: बार्शी शहरातील तुळजापूर रस्त्यावरील मार्केट यार्डातील व्यापाऱ्याने विश्वासाने लातूर येथील व्यापाऱ्यास ज्वारी पाठवली. एक वर्षे झाले तरी व्यापारातील ७ लाख ८० हजार ३६३ रुपये वारंवार मागणी करूनही पैसे दिले नाहीत.

सुदर्शन सुतार

Solapur News: बार्शी शहरातील तुळजापूर रस्त्यावरील मार्केट यार्डातील व्यापाऱ्याने विश्वासाने लातूर येथील व्यापाऱ्यास ज्वारी पाठवली. एक वर्षे झाले तरी व्यापारातील ७ लाख ८० हजार ३६३ रुपये वारंवार मागणी करूनही पैसे दिले नाहीत. या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात संबंधित व्यापाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवराज बसवराज वळसंगे (वय २८, रा. कडेगाव, ता. जि. अहिल्यानगर, सध्या रा. शिवट्रेडिंग कंपनी, लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नितीन शेटे (वय ४७, रा . दत्तनगर, बार्शी) यांनी  फिर्याद दाखल केली आहे.

ही घटना ३ जानेवारी २०२४ ते २ मार्च २०२४ दरम्यान घडली. याबाबतची माहिती अशी की, बार्शी येथील बाजार समितीतील गाळा क्रमांक १२६ मधून लातूर येथील शिवट्रेडिंग कंपनीला ३९ लाख ६ हजार १४८ रुपयांची ८७ हजार २१९ किलो ज्वारी ट्रकने पाठवण्यात आली होती.

धान्य पोहोच होताच बँकेत ‘आरटीजीएस’द्वारे पैसे जमा होत असत. ज्वारीचे १० जानेवारी ते २ एप्रिल २०२४ पर्यंत २६ लाख २५ हजार ७८५ व २१ सप्टेंबर ते १७ जानेवारी २०२५ पर्यंत ५ लाख रुपये दिले असे एकूण ३१ लाख २५ हजार ७८५ रुपये पाठवण्यात आले आहेत.

परंतु उर्वरित रक्कम ७ लाख ८० हजार ३६३ रुपये बाकी आहेत त्यासाठी संपर्क बंद लागतो, लातूर येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. पण रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शेटे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे तपास करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Sowing: पुणे विभागात गहू पेरणी ८२ टक्क्यांवर

FPO Success Story: शेतकरी हिताला प्राधान्य देत ‘श्रमविकास’ ची झेप

Farm Road Scheme: पाणंद, शेतरस्त्यांसाठी स्वतंत्र योजना राबवविणार

Drug case: अमलीपदार्थ कारखानाप्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा घ्या : हर्षवर्धन सपकाळ

Khandesh Farmer Issue: ओल्या दुष्काळी सवलती लागू असताना पीककर्ज वसुली

SCROLL FOR NEXT