Financial Fraud : ‘स्वामी समर्थ’च्या २४ संचालकांवर गुन्हा

Swami Samarth Sugar Factory : स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, त्यांचे चिरंजीव संचालक संजीव पाटील आणि उपाध्यक्षांसह कारखान्याच्या २४ संचालकांवर अक्कलकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Solapur News : तारण साखरेची परस्पर विक्री करून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४६ कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दहिटणे (ता. अक्कलकोट) येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, त्यांचे चिरंजीव संचालक संजीव पाटील आणि उपाध्यक्षांसह कारखान्याच्या २४ संचालकांवर अक्कलकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा बँकेचे निरीक्षक लक्ष्मीपुत्र हौदे यांनी फिर्याद दिली आहे. हौदे यांच्या फिर्यादीनुसार स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील, उपाध्यक्ष काशिनाथ रामचंद्र भरमशेट्टी, संचालक, माजी आमदार शिवशरण बिराजदार, सुरेश गड्डी, बसलिंगप्पा खेडगी, स्वामीराव पाटील, महेश लक्ष्मीपुत्र पाटील,

Sugar Factory
Sugar Factory : पारनेर कारखाना विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

शरणबसप्पा बिराजदार, जयशेखर पाटील, संजीव सिद्रामप्पा पाटील, विवेकानंद उंबरजे, अनिता पाटील, प्रकाश खांडेकर, हणमंतप्पा कात्राबाद, बोंडग्या यामाजी, भीमाशंकर धोत्री, शांताबाई बाके, तुळसाबाई वाघमोडे, यशवंत घोंगडे, निजमोद्दीन बिराजदार, श्रीमंत देसाई, पिरोजी शिंगाडे, जलील बागवन, प्रभारी कार्यकारी संचालक चंद्रकांत मिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Sugar Factory
Warana Sugar Factory : प्रतिटन ३२२० रुपये पहिला हप्ता देण्याची वारणा कारखान्याची घोषणा

याबाबत माहिती अशी, की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वामी समर्थ साखर कारखान्याला ६१ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. त्यापोटी साखर कारखान्याने बँकेकडे साखर तारण ठेवली होती. त्यानुसार मंजूर कर्जातील रक्कम स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर बँकेकडून जमा करण्यात आली होती. तत्पूर्वी कारखान्याचे अधिकारी, पदाधिकारी संचालक मंडळाने जिल्हा बँकेच्या नावे करारनामा,

वचनचिठ्ठी, हमीपत्र आणि ताबेगहाण लिहून दिले होते. त्यानुसार ताबा बँकेकडे दिला होता. त्याप्रमाणे बँकेने साखर तपासून गोदामाला कुलूप लावून सील केले होते. परंतु स्वामी समर्थ कारखान्याचे संचालक आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने वेळोवेळी एकूण रक्कम ४६ कोटी ३७ लाख रुपये एवढ्या रकमेच्या साखरेची परस्पर विल्हेवाट लावून मिळालेल्या रकमेचा परस्पर अपहार केला. तसेच कारखान्याच्या संचालक मंडळाने बँकेचा विश्‍वासघात करुन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com