Barseem Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Barseem Fodder : हिवाळ्यात करा बरसीम चारा लागवड

Management of Barseem Fodder : बरसीम घास हे रब्बी हंगामात येणारे ४ ते ५ कापण्या देणारे, कमी खर्चात अधिक चारा उत्पादन देणारे मेथीवर्गीय चारा पीक आहे.

Team Agrowon

देवानंद राऊत, डॉ. नंदकिशोर हिरवे

Fodder Production : द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा दुग्ध व्यावसायिकांसाठी सतत भेडसावणारी समस्या असते. त्यासाठी बरसीम घास हे रब्बी हंगामात येणारे ४ ते ५ कापण्या देणारे, कमी खर्चात अधिक चारा उत्पादन देणारे मेथीवर्गीय चारा पीक आहे. बरसीम हे मेथीघासप्रमाणे दिसणाऱ्या बहुगुणी पिकाची उंची मात्र लसूण घासाएवढी असते. काही भागात या पिकास ‘घोडा घास’ असे म्हणतात.

या पिकाचा चारा रुचकर, पालेदार लुसलुशीत, सकस व चविष्ट असतो. या चाऱ्यामध्ये जवळपास १६ ते १८% प्रथिने असल्यामुळे दुभत्या जनावरांच्या प्रकृतीला मानवतो. दूध उत्पादनात वाढ होते. ४ ते ५ कापण्या होऊन भरपूर हिरवा चारा मिळत असल्याने हे पीक अनेकार्थाने फायदेशीर ठरते.

जमीन : मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. काळी कसदार गाळाची उत्तम प्रतीची जमीन आवश्यक असते. आम्लयुक्त आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत बरसीम चार पिकाची वाढ होत नाही.

हवामान : या पिकास थंड व कोरडे हवामान आवश्यक आहे. उष्ण व दमट हवामान या पिकास अनुकूल नाही. जेवढा थंडीचा कालावधी जास्त तेवढ्या जास्त कापण्या मिळतात.

पूर्व मशागत : एकदा खोल नांगरट करून २ ते ३ वेळा कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी. पेरणीसाठी सपाट ५ बाय ३ मीटर आकाराचे वाफे तयार करावे.

पेरणी : पेरणी शक्यतो ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते नोव्हेंबर अखेरपर्यंत करावी. पेरणी फार लवकर केल्यास थंडी कमी असल्याने उगवण व्यवस्थित होत नाही. तसेच सुरुवातीची वाढ जोमदार होत नाही. उशिरा पेरणी केल्यास शेवटच्या कापण्या मार्च अथवा एप्रिल महिन्यात येतात. त्या काळात थंडीचे प्रमाण कमी झाल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

बीज प्रक्रिया : रायझोबिअम जीवाणूसंवर्धन २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे पेरणीपूर्वी चोळावे. पेरणीपूर्वी बरसीमचे बी १० लिटर पाण्यात १०० ग्रॅम मीठ टाकून तयार केलेल्या द्रावणात टाकावे. या द्रावण तरंगणारे बी पोचट असते, ते व त्यासोबतच काडीकचरा काढून टाकावा.

सुधारित जाती : वरदान, मेस्कावी, जे. बी-१, एच. बी-१४६ इ.

खत व्यवस्थापन : पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी १० ते १२ बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी २० किलो नत्र (४४ किलो युरिया), ८० किलो स्फुरद (५०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट), ४० किलो पालाश (६६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) मिश्रण करून पेरणीपूर्वी द्यावे.

पाणी व्यवस्थापन : या पिकास १० ते १२ दिवसाच्या अंतराने पाणी घ्यावे. सुरुवातीच्या दोन आठवड्यामध्ये एक आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे.

आंतरमशागत : एक खुरपणी व एक कोळपणी करून शेत तणविरहित ठेवावे.

कापणी : हिरव्या चाऱ्यासाठी बरसीमची पहिली जावळ कापणी साधारणतः पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी करावी. नंतरच्या कापण्या २१ ते २५ दिवसाच्या अंतराने कराव्यात. अशा प्रकारे ऑक्टोबरमध्ये पेरणी केल्यास बरसीमद्वारे ४ ते ५ कापण्या घेणे शक्य होते. पेरणीस उशीर झाल्यास ३ ते ४ कापण्या मिळतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT