Agriculture Facilitation Fund Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Facilitation Fund : कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेत बँकांची भूमिका महत्त्वाची

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.

Team Agrowon

Washim News : आज केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायांची जोड देणे आवश्यक आहे. शेतीत मजुरांचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावत आहे. काढणी पश्चात सुविधा निर्माण झाल्या तर शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळेल.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासोबत शेतीपूरक व्यवसायाला गती देण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेत बँकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचे राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे यांनी केले.

नियोजन समितीच्या सभागृहात ‘आत्मा’च्या वतीने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेवरील कृती संगम कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून कांबळे बोलत होते.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके, उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश ठोंबरे, कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभागाच्या प्रा. शुभांगी वाटाणे, मत्स्य विकास अधिकारी श्रीमती जैन, पोकराचे विषय विशेषज्ञ मिलिंद अरगडे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी संतोष वाळके व जिल्हा संसाधन व्यक्ती गोपाल मुठाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कांबळे म्हणाले, की कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव बँकांकडे सादर करावेत.

शेतकरी, बँक आणि शासन यांचा सुरेख कृती संगम या प्रकल्पातून होणार आहे. पोकरा, स्मार्ट व मॅग्नेट या योजना जिल्ह्यात राबविण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीतून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

या योजनेचा राज्यासाठी ८४६० कोटी रुपयांचा लक्ष्यांक आहे. बँकांच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ २०२५-२६ पर्यंत द्यायचा आहे. कोरोना काळात सर्व क्षेत्र ठप्प झाले असल्याचे आपण बघितले.

फक्त कृषी क्षेत्र हे एकमेव असे क्षेत्र आहे, जे कोणत्याही काळात थांबणार नाही. कर्ज वितरण या योजनेतून सहा वर्षे करण्यात येणार आहे. तर कर्ज परतफेडीचा कालावधी हा सात वर्षाचा आहे.

या योजनेअंतर्गत एका उद्योजकास/शेतकऱ्यास २९ प्रकल्पांचा लाभ घेता येईल, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक तोटावर यांनी केले. बारापात्रे, फडके, जैन यांनी विविध योजनांची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात १३ जिल्ह्यांत एल्गार; कोल्हापुरातील बैठकीत निर्धार

State Cooperative Bank Anniversary: राज्य सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बालनाट्याचा उपक्रम

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

SCROLL FOR NEXT