Groundnut new Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut New Variety : बांगलादेश करणार टपोऱ्या भुईमुगाच उत्पादन

Bangladesh Chinabadam-12 Groundnut : चिनाबदाम-१२ या भुईमूग वाणाच्या बांगलादेशात चाचण्या घेतल्या नंतर या वाणाला व्यावसायिक लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे. लवकरच हे भुईमुगाचे वाण येत्या हंगामात बांगलादेशात लागवडीसाठी उपलब्ध होणार आहे.

Team Agrowon

Bangladesh Groundnut Production : भुईमूग हे बांगलादेशातील तिसरे सर्वात महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. बांगलादेशात रोस्टेड स्वरुपात आणि विविध प्रकारच्या मिठाईमध्ये शेंगदाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे प्रक्रिया उद्योगात भुईमुगाला चांगली मागणी आहे. मात्र अलीकडच्या काळात बांगलादेशातील भुईमुगाचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे बांगलादेश सरकार भुईमुगाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करत आहे. दर्जेदार बियाण्याचा आभाव, सुधारित जातींची कमतरता, उत्पादन तंत्रज्ञान, अकुशल मजूर आणि साठवण सुविधांचा अभाव हे बांगलादेशातील भुईमूग उत्पादनातील प्रमुख अडथळे आहेत.  

नदी काठच्या पानथळ जमिनी, पावसाळ्यात पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत तसेच खडकाळ मुरमाड जमिनीवर भुईमुगाची लागवड होते. याठिकाणी प्रामुख्याने ढाका -१ या वाणाची लागवड केली जाते.  हे वाण लवकर परिपक्व होणारे असल्यामुळे  बांगलादेशातील शेतकरी या वाणाला अधिक पसंती देतात. मात्र उत्पादकता कमी असल्यामुळे या वाणाला अधिक उत्पादनक्षम पर्यायी वाण उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली. या दृष्टीकोनातून प्रयत्न करताना बांगलादेशातील भुईमुग उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी हैद्राबाद येथील अर्ध-शुष्क उष्ण कटिबंधीय आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था (इक्रीसॅट) आणि बांगलादेश कृषी संशोधन संस्थेने (बीएआरआय) एकत्रितपणे भुईमुगाचे चिनाबदाम-१२ (आयसीजीव्ही ०७२१९) हे सुधारित वाण विकसीत केले आहे. या वाणाच्या बांगलादेशात चाचण्या घेतल्या नंतर या वाणाला व्यावसायिक लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे. लवकरच हे भुईमुगाचे वाण येत्या हंगामात बांगलादेशात लागवडीसाठी उपलब्ध होणार आहे. 

चिनाबदाम-१२ (आयसीजीव्ही ०७२१९)वाणाची वैशिष्ट्ये

चिनाबदाम-१२ (आयसीजीव्ही ०७२१९)या  वाणाचे बियाणे आकाराने मोठे आहे.  

या वाणाच्या १०० ग्रॅम शेंगाचे वजन ४४ ते ४८ ग्रॅम भरले. जे चेक वाणाच्या तुलनेत ४ ते ८ ग्रॅमने जास्त होते.  

हे वाण पानावरिल बुरशीजन्य रोगांप्रती सहनशील असून चार दिवस आधीच परिपक्व होते. 

नदी काठच्या जमिनी, पावसाळ्यात पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत तसेच खडकाळ मुरमाड जमिनीवर हे वाण चांगल्या प्रकारे येऊ शकते. 

इक्रीसॅट चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ जेनिला पासुपुलेटी यांनी दिलेल्या माहितीनूसार हे वाण स्पॅनिश बंच प्रकारातले असून थ्री-वे क्रॉसद्वारे विकसित करण्यात आले आहे. बांगलादेश कृषी संशोधन संस्थेच्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील प्रमुख वैज्ञानिक अधिकारी डॉ. मंजुरुल खदीर यांनी अन्न प्रक्रिया उद्योगातील भुईमुगाची वाढती मागणी पाहता देशांतर्गत भुईमूग उत्पादन वाढविण्याच्या गरजेवर भर दिला. नदी काठच्या पानथळ जमिनी, पावसाळ्यात पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत तसेच खडकाळ मुरमाड जमिनीसाठी भुईमुगाचे हे वाण फायदेशिर ठरणार आहे. असे डॉ. मंजुरुल खदीर म्हणाले. येत्या काळात इक्रीसॅट आणि बीएआरआय प्रक्रिया उद्योगाची मागणी पाहता उच्च ओलीक ऍसिड असणारे भुईमुगाचे वाण विकसीत करण्यावर भर देणार आहे. असे इक्रीसॅट चे डॉ. मेस म्हणाले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT