Hilsa Fish Export Agrowon
ॲग्रो विशेष

Hilsa Fish Export : बांगलादेशने हिलसा माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवली; भारतला ३ हजार टन मासा करणार निर्यात

Hilsa Fish Export Ban : बांगलादेशच्या अंतरिम सरकारने लोकप्रिय हिलसा माशाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तर प्रोफेसर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारतात होणारी निर्यात थांबवली होती.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : काही दिवसांपूर्वी भारतात होणारी हिलसा माशाच्या निर्यातीवर बांगलादेश सरकारने बंदी घातली होती. ती शनिवारी (ता.२१) अंतरिम सरकारने उठवली आहे. तर आगामी दुर्गा पूजा उत्सवाआधी भारताला ३ हजार टन मासळी निर्यात करण्यास मंजुरी दिली. याआधी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने हिल्सा मासळीच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

दुर्गा पूजा उत्सवापूर्वी बांगलादेश सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. देशाच्या अंतरिम युनूस सरकारने भारतात लोकप्रिय असणाऱ्या हिलसा मासळीवरील निर्यात बंदी उठवली. शेख हसीना गेल्यावर नवीन आलेल्या अंतरिम युनूस सरकारने हिलसा मासळीच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, या निर्णयावरून सरकारला आता माघार घ्यावी लागली असून बंदी उठवत हिलसा मासळीच्या निर्यातीला मान्यता द्यावी लागली आहे. बांगलादेशमध्ये ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान दुर्गा पूजा उत्सव साजरा केला जातो.

निर्यातदारांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर, विशिष्ट अटी पूर्ण करून आगामी दुर्गापूजेच्या निमित्ताने हिलसा मासळी निर्यात केली जाणार आहे. भारतास ३ हजार टन मासळी निर्यात करण्यास मान्यता दिल्याचे बांगलादेशच्या वाणिज्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच मंत्रालयाने अर्जदारांना निर्यात परवानगी मिळविण्यासाठी संबंधित शाखेशी संपर्क करावा, असेही आवाहन केले आहे.

याआधी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकारने भारताला मासळी निर्यात करण्याचा निर्णय घेतला होता. दरवर्षी सद्भावना म्हणून दुर्गापूजेच्या आधी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान हिलसा मासळी निर्यात करण्यास मान्यता दिली होती. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू होती. पण अंतरिम युनूस सरकारने ही परंपरा खंडीत करणारा निर्णय घेतला होता.

बांगलादेश हा जगातील सर्वात मोठा हिलसा मासळी उत्पादक देश आहे. तर बांगलादेशने २०२३ मध्ये ७९ कंपन्यांना भारताला एकूण ४ हजार टन निर्यात करण्याची परवानगी दिली होती. पण स्थानिक मागणी जास्त असल्याचे कारण पुढे करत या माशाच्या निर्यातीवर सरकारने बंदी घातली होती.

यानंतर फिश इम्पोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सप्टेंबरच्या सुरुवातीला बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसैन यांच्याशी संपर्क केला होता. तसेच दुर्गापूजेदरम्यान भारतात हिल्सा मासळीच्या निर्यातीला परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता बांगलादेश सरकारने भारताला मासळी निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Storage: जायकवाडीत झपाट्याने वाढतोय पाणीसाठा

Farm Loan Waiver: सांगली जिल्ह्यात ५० हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र

Khandesh Rain: खानदेशात तुरळक पावसाची हजेरी

Farm Loan Waiver: बुलडाण्यात कर्जमुक्तीसाठी १२,१०७ शेतकरी ठरले पात्र

Khari Jowar Sowing: मराठवाड्यात केवळ ५,९२५ हेक्टरवर खरीप ज्वारीची पेरणी

SCROLL FOR NEXT