Sangli Agriculture Loan Waiver Updates: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५० हजार ६० शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांच्या नावावर व्याजासह तब्बल ५२० कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. शासनाने कर्जमुक्तीची पहिली यादी जाहिर केली असून जिल्ह्यातील यादी कधी जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. .राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक पीक कर्ज वाटपात सांगली जिल्हा बॅंकेचा वाटा आहे.जिल्हा उपनिबंधक विभागाने जिल्ह्यातील कर्जदाशासरांची माहिती एकत्रित करून अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे..Farm Loan Waiver: कर्जमाफीस पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध होणार.जिल्हा बॅंकेकडील ५० हजार ६० शेतकऱ्यांचे ५२० कोटी ०७ लाखाचे कर्ज थकीत आहे. हे शेतकरी कर्जमुक्तीस पात्र ठरले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत दोन बदल केले आहेत. २०१९ मधील कर्जमाफी घेतलेल्याही शेतकऱ्यांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार होती..त्यामध्ये वाढ करुन मार्च २०२६ पर्यंत वाढ करण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेचे या तारखेपर्यंतचे थकबाकीदार शेतकरी तब्बल ५० हजार ६० असून, त्यांच्याकडे मुद्दल ४०८.९१ कोटी रुपये, व्याज १११.१५ कोटी रुपये आहे. एकूण थकबाकी ५२० कोटी ७ लाख रुपये आहे. नियमित कर्जफेड करणारे १ लाख ७७ हजार आहेत..Farmer Loan Waiver List : दोन लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी अपलोड.जिल्हा बॅंकेचे मार्च २०२६ अखेरचे तालुकानिहाय कर्जदार व त्यांची व्याजाहह कर्जतालुका थकबाकीदार शेतकरी थकबाकी (लाखांत)आटपाडी २१२५ ४२३६.३२जत १४,५७० १४,५५९.५७कवठेमहांकाळ ४८७९ ४६९७.९७कडेगाव १६६४ १६४७.३३खानापूर २१५९ २००८.५६मिरज ७६०८ ८७५९.२५.पलूस ३२९८ ३२८५.८१शिराळा १४७९ ८३८.६९तासगाव ८३६७ १०,८१९.२९वाळवा ३९११ २९५४.४८एकूण ५०,०६० ५२,००७.२७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.