Jayakwadi Reservoir Update: मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात नाशिक विभागातील धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी (ता. २५) दुपारी १२ वाजेच्या सुमारास जायकवाडी धरणात ७४,७१८ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा ४१.४६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे..माहितीनुसार, शुक्रवारी (ता. २४) दुपारी १२ वाजेच्या सुमारास जायकवाडीत ९७,७८७ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती..Jayakwadi Dam Water Storage: जायकवाडीत ९७ हजार ९८७ क्युसेकने पाण्याची आवक.त्यानंतर दुपारी ३ वाजता आवक ३६,७४९ क्युसेक, तर सायंकाळी ६ वाजता ५६,३४० क्युसेक इतकी झाली होती..Jayakwadi Dam Backwater: जायकवाडीच्या पाणी फुगवट्याने शेती जलमय.शुक्रवारी पहाटे २ वाजता धरणात केवळ २,२०३ क्युसेक पाण्याची आवक होती. सकाळी ९ वाजेपर्यंत ती ९ हजार क्युसेक झाली. सकाळी १० वाजता आवकेचा वेग वाढून ५१,४४३ क्युसेक, तर दुपारी १२ वाजता तो ९७,९८७ क्युसेक इतका झाला. शुक्रवारी रात्री ९ वाजता आवक ५३,८९८ क्युसेक झाली होती..त्यानंतर पुन्हा आवकेत वाढ होऊन शनिवारी (ता. २५) दुपारी १२ वाजेच्या सुमारास ती ७४,७१८ क्युसेक इतकी नोंदविण्यात आली. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, मराठवाड्यासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.