Banana Market Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Procurement : खानदेशात केळीची कमी दरात खरेदी सुरूच

Banana Market : सध्या केळीची अधिक आवक यावल, रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, भडगाव, पाचोरा, नंदुरबारातील शहादा, तळोदा आदी भागांत सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात नवती व आगाप कांदेबाग केळी बागांची काढणी सुरू आहे. परंतु प्रचलित दरांच्या तुलनेत २०० ते ३०० रुपये कमी दरात केळी खरेदीचा प्रकार रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, यावल, नंदुरबारातील शहादा, तळोदा आदी भागात सुरू आहे. नफेखोरीसाठी खरेदीदार कमी दरात खरेदी करीत असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

सध्या केळीची अधिक आवक यावल, रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, भडगाव, पाचोरा, नंदुरबारातील शहादा, तळोदा आदी भागांत सुरू आहे. परंतु कमी दर्जाच्या केळीचे कारण सांगून केळीची खरेदी प्रचलितपेक्षा २०० ते ३०० रुपये कमी दराने केली जात आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खरेदीदार शेतकऱ्यांना केळीच्या काढणीचे आश्वासन देत आहेत. परंतु केळी काढणीला चार ते पाच दिवस उशीर केला जातो.

तोपर्यंत काढणीयोग्य केळी झाडांची घडाचे वजन व अन्य कारणांनी पडझड होते. आणखी नुकसान होईल, या भीतीने शेतकरी कमी दरात काढणीला तयार होतात. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, नैसर्गिक समस्यांचा गैरफायदा खरेदीदात घेत आहेत. खानदेशात सध्या केळीचे दर १२०० ते १५०० रुपये, एवढे जाहीर होत आहेत.

परंतु खानदेशात अनेक भागांत केळीची काढणी ९०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जात आहे. काही शेतकऱ्यांना फक्त ८०० रुपये दर दिला जात आहे. जळगाव तालुक्यातही काही शेतकऱ्यांची केळी काढणीवर आहे, या भागातही कमी दरात केळीची खरेदी करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे जे दर जाहीर होत आहेत, त्यातच खरेदीची सक्ती व्यापारी, खरेदीदारांना करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

केळीचे दर रावेर येथील बाजार समिती रोज जाहीर करीत आहे. परंतु जे दर जाहीर होतात, त्यात खरेदी केली जात नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. केळीची ९६ ते ९७ टक्के खरेदी थेट शेतात किंवा शिवार खरेदी केली जाते. या खरेदीवर बाजार समिती, प्रशासन किंवा जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक कार्यालयाचे नियंत्रण कुठेही नाही. हे नियंत्रण नसल्याने खरेदीदार मनमानी करीत आहेत.

केळी नाशिवंत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी करून कमी दरात खरेदीचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. केळी खरेदीदारांची नोंदणी, परवाने याचीदेखील तपासणी कुठे केली जात नाही. फक्त दर जाहीर करण्याचे काम बाजार समित्या करतात, अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यात अनेकदा खरेदीदार केळी काढणीनंतर शेतकऱ्यांची फसवणूकही करीत आहेत, असेही सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT