Crop Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : केळी, लिंबू उत्पादकांना भरपाई मिळण्याची अपेक्षा

Crop Damage Compensation : नुकसानीचे पंचनामे झाले, परंतु भरपाई केव्हा मिळेल, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात जळगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, जामनेर तालुक्यांना उन्हाळ्यात अनेकदा तुफान वादळी-वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे शेतामधील उभी केळी तर आडवी झालीच शिवाय लिंबासह मका, ज्वारी, गहू आदी उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

नुकसानीचे पंचनामे झाले, परंतु भरपाई केव्हा मिळेल, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. काहींच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंसह अन्य सामानही भिजले होते. जामनेर तालुक्यातील खडकी-बोरगाव, महुखेडा, लोणी, गोरनाळे, आमखेडा, सावरला, तळेगाव आदी गावांना या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला होता.

जळगाव, पाचोरा, एरंडोल आदी भागांतही अनेक गावांत नुकसान झाले. एरंडोलातील उत्राण गावास मोठा फटका वादळी पावसात मे व जूनमध्ये बसला होता. ८ ते ११ एप्रिल या कालावधीत मोठा वादळी पाऊस जामनेर भागात झाला होता. जामनेर शहरालाही पावसाने झोडपले होते.

पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश होते. यानंतर पंचनामे झाले. या झालेल्या नुकसानीची राज्य शासनाने दखल घेतली. पण नुकसानग्रस्त शेतकरी, पीडितांना आवश्यक सर्व ती मदत मिळालेली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अमळनेरमध्येही नुकसान

अमळनेर, यावल या भागांतही एप्रिल ते मे या कालावधीत गारपीट, वादळी पाऊस झाला होता. सलग तीन-चार दिवस पाऊस, वादळ झाले. यात पिकांची मोठी हानी झाली आहे. पंचनामेही तीन दिवस सुरूच होते. पंचनामे पूर्ण करून अहवाल प्रशासनाने सादर केला आहे. नुकसानग्रस्तांना भरीव मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT