Banana Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Storm Damage Compensation : वादळात नुकसानीच्या परताव्यांची केळी विमाधारकांना प्रतीक्षा

Crop Damage Compensation Update : २०२२-२३ मधील केळी विमाधारकांना या योजनेतून अद्यापही वादळात नुकसान भरपाईसंबंधीचे परतावे मिळालेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना यंदा विमा कंपनीची अनागोंदी व शेतकऱ्यांच्या तक्रारी यामुळे सतत चर्चेत आहे. यातच २०२२-२३ मधील केळी विमाधारकांना या योजनेतून अद्यापही वादळात नुकसान भरपाईसंबंधीचे परतावे मिळालेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे.

जिल्ह्यात १० हजार ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा विमा योजनेतील सहभाग चुकीचे अहवाल व अतांत्रिक मुद्द्यांच्या आधाराने विमा कंपनीने रद्द केल्याने शेतकरी संतप्त झाले असून, येत्या २० जानेवारीपर्यंत यासंबंधी सकारात्मक तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा लोकप्रतिनिधी, राज्य शेतकरी संघटनेने यापूर्वीच दिला आहे.

अशातच २०२२-२३ मध्ये केळी विमाधारकांच्या केळीची वादळात मोठी हानी यावल, रावेर, जळगाव, मुक्ताईनगर, चोपडा आदी भागांत झाली. यासंबंधी सुमारे पाच हजार तक्रारी विमा कंपनीकडे दाखल झाल्या होत्या. त्यानुसार विमा कंपनी व शासनाच्या प्रतिनिधींनी पंचनामे केले व त्याचे अहवाल विमा कंपनीकडे सविस्तर सादर करण्यात आले.

मे, जून महिन्यात विविध टप्प्यांत किंवा कालावधीत जिल्ह्यात वादळ झाले होते. हे पंचनामे काही भागात उशिरा झाले. पात्र विमाधारकांना हे परतावे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये मिळणे अपेक्षित होते. परंतु नवे वर्ष सुरू झाले तरीदेखील परतावे केळी विमाधारकांना वादळात नुकसानसंबंधी मिळालेले नाहीत.

केळी पिकाची वादळात हानी झाल्याने काही भागात ६० ते ७० टक्के नुकसान झाले आहे. काही भागात नुकसान पातळी ४० ते ४५ टक्के होती. रावेरात मोठी हानी काही गावांत झाली होती. तसेच जळगाव, चोपडा भागातही हानी झाली होती. शेतकरी वित्तीय संकटात आहे. यामुळे परतावे तत्काळ दिले जावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या विमा कंपनीकडे चकरा

वादळात नुकसानीसंबंधी पंचनामे झालेल्या केळी विमाधारक शेतकऱ्यांना परतावे मिळालेले नसल्याने शेतकरी विमा कंपनीच्या स्थानिक कार्यालयात संपर्क करीत आहेत. तसेच जिल्हास्तरावरही संपर्क साधत आहेत. परंतु विमाधारकांना समाधानकारक माहिती दिली जात नाही. यामुळे काही शेतकरी कृषी विभागाकडेही आपले म्हणणे सादर करीत आहेत.

परंतु कृषी विभागदेखील शेतकऱ्यांची समस्या दूर करायला तयार नाही. परताव्यांचा निधी केव्हा येणार, किती शेतकऱ्यांना मिळणार याबाबत कुठलीही स्पष्टता विमा कंपनी, शासनाकडे नाही. यामुळे योजनेबाबत अनागोंदी व गोंधळाची स्थिती कायम आहे, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Animal : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

Crop Insurance: पीकविमा परतावा मंजुरीत लोहा, कंधारला ठेंगा

Cultural Heritage: छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक प्रेरणादायी असेल; राम शिंदे

Wild Vegetables: रानभाज्यांना मिळाली बाजारपेठ

Artificial Sand: कृत्रिम वाळू धोरणासाठी जिल्ह्यात आराखडा तयार

SCROLL FOR NEXT