Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Banana Crop Insurance : राजकीय मंडळीच्या चुकीच्या तक्रारी, गावागावांती अंतर्गत कुरघोडी यातून २०२२-२३ मध्ये फळ पीकविमा योजनेबाबत चौकशा, कारवाया असा प्रकार झाला.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यातील सुमारे साडेपाच हजार केळीविमाधारक २०२३ मध्ये वादळ, वेगाचा वाऱ्यात झालेल्या नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित आहेत. विमाधारक ही नुकसान भरपाई केव्हा मिळेल, याची विचारणा करण्यासाठी कृषी विभागात जातात, पण तेथे सध्या सर्वच निवडणुकीच्या कामात असल्याचे सांगितले जाते, अशी स्थिती आहे.

राजकीय मंडळीच्या चुकीच्या तक्रारी, गावागावांती अंतर्गत कुरघोडी यातून २०२२-२३ मध्ये फळ पीकविमा योजनेबाबत चौकशा, कारवाया असा प्रकार झाला. यातच अनेक महिने वाया गेले. चौकशी करून हाती काय लागले, याची माहिती विमा कंपनी किंवा शासनाकडे नाही. परंतु २०२२-२३ या वर्षात फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या केळी विमाधारकांना कृषी विभाग, विमा कंपनीने हकनाक वेठीस धरले आहे.

केळीची २०२३ या वर्षात एप्रिल ते जुलै या महिन्यांत मोठी हानी वादळ, वेगाचा वारा यात झाली. जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा या सर्वच भागांत एप्रिल ते जुलै या दरम्यान वादळी पाऊस झाला. केळी भुईसपाट झाली. या नुकसानीत भरपाईसंबंधी केळी विमाधारकांनी तक्रारी ऑनलाइन दाखल केल्या.

सुमारे साडेपाच हजार शेतकऱ्यांनी या तक्रारी केल्या. पंचनामे झाले. नुकसानीचे अहवाल आले. पात्र केळीविमाधारकांना ही नुकसान भरपाई डिसेंबर २०२३ पर्यंतच मिळणे अपेक्षित होते. परंतु २०२४ हे वर्ष सुरू होऊन चार महिने पूर्ण होत आले तरीदेखील नुकसान भरपाई किंवा परतावे या योजनेतून मिळालेले नाहीत.

विमाधारक शेतकरी विमा कंपनीशी संपर्क करतात, पण तेथे प्रतिसाद मिळत नाही. कुठलीही ठोस माहिती, समाधानकारक उत्तर दिले जात नाही. विमा कंपनीच्या जळगाव शहरातील जिल्हा कार्यालयातही कुणी याबाबत स्पष्टपणे सांगत नाही.

कृषी विभाग, वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखविले जाते. कृषी विभाग सध्या वाऱ्यावर आहे. कारण तेथे निवडणुकीच्या कामात कर्मचारी असल्याने शुकशुकाट असतो. हे परतावे मिळत नसल्याने पुढे ते व्याजासह मिळावेत, अशी मागणी केळीविमाधारक करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT