Banana cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Farming : अकोल्यात पावसाअभावी केळी लागवड रखडली

Banana Update : जूनमध्ये पावसाच्या आगमनासोबतच केळीच्या रोप लागवडीला वेग येतो. यंदा पाऊस अद्यापही आला नसल्याने वातावरण उष्ण आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी केळी रोप लागवडीला सुरुवात केली नसल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Akola Banana News : जूनमध्ये पावसाच्या आगमनासोबतच केळीच्या रोप लागवडीला वेग येतो. यंदा पाऊस अद्यापही आला नसल्याने वातावरण उष्ण आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी केळी रोप लागवडीला सुरुवात केली नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात दरवर्षी लाखो केळी रोपांची लागवड होते. केळीचे चार ते पाच हजार एकरांपेक्षा अधिक लागवड क्षेत्र आहे. उत्पादनात सातत्य ठेवणारे पीक म्हणून केळीची लागवड वाढत आहे.

प्रामुख्याने अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी या तालुक्यांत केळीचे क्षेत्र आहे. त्यातही अकोटमध्ये पणज, अकोलखेड व इतर लगतची काही गावे ही केळीचे माहेरघर बनली आहेत. या भागात दरवर्षी १० लाखांवर रोपांची लागवड होते.

यंदा सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टिश्यू कल्चर रोपांची बुकिंग केली. काही कंपन्यांनी रोपांचा पुरवठासुद्धा केला आहे. लागवडीच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी तयारीसुद्धा केली. मात्र अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही.

तापमान दररोज ४२ ते ४२ अंशापर्यंत राहत आहे. अशातच रोपे लावली, तर नुकसान होण्याचीच शक्यता अधिक आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी आणलेली रोपे तशीच ठेवली आहेत. काही मोजक्या शेतकऱ्यांनी धाडस करून लागवड सुरू केली आहे.

या भागात दरवर्षी १५ लाखांवर अधिक रोपांची लागवड केली जाते. यंदाही मोठ्या प्रमाणात रोपांचे बुकिंग झाले आहे. काही कंपन्यांनी रोपे पुरविली देखील आहेत. तापमान कमी होताच ही लागवड सुरू होईल. शेतकऱ्यांची सर्व तयारी झालेली आहे.
दिनेश अकोटकर, शेतकरी, पणज, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ८३ व्या वर्षी निधन

Rabi Jowar Sowing: मराठवाड्यात पाच लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी

Brinjal Market: वर्षभर विविध वाणांच्या वांग्याला मागणी

Guava Farming: पेरू उत्पादनातून साधला हमखास उत्पन्नाचा मेळ

Maharashtra Voter Issue: मतदारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा

SCROLL FOR NEXT