Banana Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : केळी लागवडीसाठी कंदांना मागणी

Banana Plantation : खानदेशात अलीकडे बारमाही केळी लागवड होऊ लागली आहे. अनेक कंपन्यांनी ऐनवेळी आगाऊ नोंदणी करूनही उतिसंवर्धित केळी रोपांचा पुरवठा न केल्याने केळी लागवडीसाठी कंदांचा उपयोग शेतकरी करीत आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात अलीकडे बारमाही केळी लागवड होऊ लागली आहे. अनेक कंपन्यांनी ऐनवेळी आगाऊ नोंदणी करूनही उतिसंवर्धित केळी रोपांचा पुरवठा न केल्याने केळी लागवडीसाठी कंदांचा उपयोग शेतकरी करीत आहेत. त्यातच दर्जेदार व हवे ते वाण किंवा कंद मिळत नसल्याने लागवड रखडत सुरू आहे.

अनेक शेतकऱ्यांचा कल केळी रोपे लागवडीकडे आहे. परंतु लागवड वाढल्याने रोपांचाही तुटवडा आहे. रोपांची मागणी यंदा मागील वर्षापेक्षा मोठी आहे. परंतु रोपांचा पुरवठा आगाऊ पैसे व नोंदणी करूनही अनेक कंपन्यांनी केला नाही. यामुळे लागवडीसाठी कांदाचा उपयोग वाढला आहे.

मागील महिन्यातही केळी कंद तुटवडा होता. अजूनही अशीच स्थिती आहे. काही लहान कंपन्या केळी रोपे देत आहेत. परंतु त्यांना मागणी कमी आहे. शेतकऱ्यांना नामांकित कंपन्यांची केळी रोपे मिळत नसल्याने कंदांचा उपयोग सुरू आहे. खानदेशात सुमारे १० केळी रोपे पुरवठादार कंपन्या रोपे देत आहेत.

खोडवा व जुनारी केळी बागांमधील कंद हवे तसे अंकुरत नाहीत. तसेच पुढे त्यांची निसवण, काढणी याबाबतही अडचणी असतात. सध्या पिलबाग व जुनारी केळी बागांतच कंद आहेत. नवती बागांत कंद नाहीत. कारण त्यांची काढणी सुरू झालेली नाही. यामुळे शेतकरी काढणी ६० ते ७० टक्के पूर्ण झालेल्या केळी बागांमधील कंद मिळण्यासाठी आणखी एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागेल.

कंदांची विक्रीही आता मोठा व्यावसाय खानदेशात बनला आहे. पूर्वी शेतकरी आपल्या बागांमधील कंद मोफत द्यायचे, परंतु आता मोफत कंद अपवादानेच मिळतात. अनेक शेतकरी दोन ते तीन रुपया दर घेऊन कंद देत आहेत. कारण कंदांची मागणी आहे. गावोगावी कंद पुरवठादार, एजंटही कार्यरत आहेत. कंद काढण्याची मजुरी व इतर खर्चही लागतो.

केळी लागवडीत मोठी वाढ

अनेक शेतकरी सातमासी, आंबेमोहोर, श्रीमंती, वसई, महालक्ष्मी आदी वाणांसाठी छत्रपती संभाजीनगरातील कन्नड, सोयगाव भागातही जात आहेत. तसेच नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागातही कंदांसाठी शेतकरी जात आहेत. केळी लागवडीत यंदा मोठी वाढ झाली आहे. कांदेबाग केळीची लागवड डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत झाली. सध्या जळगाव, चोपडा, यावल, जामनेर आदी भागात शेतकरी केळी लागवड करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टी, महापूर नुकसानीचे ४०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Fisheries Development: मत्स्य उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत

Farmer Issue: तालुका कृषी कार्यालय केवळ एका कर्मचाऱ्याच्या भरवशावर

Ativrushti Madat: नांदेडला हेक्टरी दहा हजार प्रमाणे ७२८ कोटींचा निधी मंजूर

Sugarcane Payment: निवडणुकीच्‍या गाळपात ऊसदराचा विसर

SCROLL FOR NEXT