Banana Market Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Arrival : खानदेशात केळीची आवक ३२०० टनांनी वाढली

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात केळीची आवक मागील आठ ते १० दिवसांत सुमारे २०० ट्रकने (एक ट्रक १६ टन क्षमता) वाढली आहे. आवक पुढेही वाढणार असून, दरातही चढउतार झाले आहेत. दर्जेदार किंवा काश्मिरात पाठवणुकीच्या केळीला कमाल १६०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.

८००, १०००, १२००, १३०० ते १६५० रुपये प्रति क्विंटलचा दर केळीस खानदेशात आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर केळीला मागणी राहिली. परंतु आवकेत सतत वाढ झाली आहे. मार्चच्या सुरुवातीपर्यंत खानदेशात केळीची प्रतिदिन ५५ ते ५६ ट्रक एवढी आवक होती. त्यात मार्चच्या मध्यानंतर मोठी वाढ झाली आहे. मार्चच्या मध्यापर्यंत खानदेशात प्रतिदिन सरासरी २५० ट्रक केळीची आवक होत होती.

आजघडीला ही आवक ३५५ ट्रकपर्यंत पोचली आहे. केळीची पाठवणूक काश्मिर, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशात केली जात आहे. कमी दर्जाच्या केळीचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. मध्यम दर्जाच्या केळीला १२०० ते १३०० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावलमध्ये मिळून रोज २५० ट्रक एवढी केळीची आवक होत आहे. मागील वर्षी मे व जूनमध्ये लागवड केलेल्या केळी बागांतून (मृग बहर) केळीची मोठी आवक रावेर, मुक्ताईनगर, यावल भागात होत आहे. दर्जेदार केळी या भागात उपलब्ध आहे. आवक वाढल्याने दरात सतत घट झाली आहे, अशी माहिती मिळाली.

सोलापुरच्या तुलनेत खानदेशात अधिक दर
खानदेशातील केळीला उत्तरेकडे उठाव आहे. सोलापुरात केळीचे दर मध्यंतरी सर्वाधिक होते. परंतु सोलापुरात सध्या कमाल १३५० ते १४०० रुपये प्रति क्विंटलचा दर दर्जेदार केळीस आहे. सोलापुरातून केळीची निर्यात अधिक आहे. निर्यातीच्या केळीचा खर्च निर्यातदारांना अधिकचा पडत आहे. यामुळे निर्यातीच्या केळीचे दर सतत कमी झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT