Dr. Vijaykumar Gavit Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal Development : आदिवासी, सर्वसाधारण क्षेत्राचा समतोल विकास साधणार

Team Agrowon

Nandurbar News : नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने या जिल्ह्यात आदिवासी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असला तरीही, सर्वसाधारण क्षेत्रासाठी आदिवासी विकास विभाग व राज्याकडून निधी आणून आदिवासी आणि सर्वसाधारण क्षेत्राच्या विकासाचा समतोल साधला जाणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

शहादा तालुक्यातील टेंभ्यासह पंचक्रोशीतील गावांमध्ये विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते रविवारी (ता. २५) बोलत होते. या वेळी टेंभे, देऊर, भडगाव, खैरवे, फेस या गावांतील जलजीवन मिशनच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना, ठक्कर बाप्पा योजनेच्या आदिवासी वस्ती, सामाजिक सभागृह, रस्त्याचे काँक्रीटीकरण, तीर्थक्षेत्र विकास, भक्त निवास उभारणे या कामांचे भूमिपूजन मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषद सदस्या वृंदावनी नाईक, गुलाब मालचे शहादा पंचायत समितीचे सभापती वीरसिंग ठाकरे, राजू पाटील, पप्पू गिरासे, बापू गिरासे, दिलावर मालचे, करणसिंग गिरासे, भगवानसिंग गिरासे, भिकेसिंग गिरासे, आधार माळीच, महेंद्रसिंग गिरासे, दिवाणसिंग गिरासे, राजेंद्र पाटील, गजानन माळी व पंचक्रोशील स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.

अर्जानंतर एक महिन्यात घरकुल मंजूर

मंत्री डॉ. गावित म्हणाले, की येणाऱ्या काळात शहादा तालुक्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्र व उपयोजनेबाहेरील क्षेत्र यात योग्य समतोल साधून गरजेनुसार विकासाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जेथे आदिवासी विकास विभागामार्फत निधी द्यायचा तो देण्याबरोबरच सर्वसाधारण योजनांच्या निधीमधूनही भरीव तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून विद्युतीकरणासाठी २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan and Namo Yojana : 'पीएम किसान’चा १८ वा आणि ‘नमो’चा पाचवा हप्ता खात्यात जमा

Congress questions on Modi's visit : राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपवले, भाजपने काय केलं? काँग्रेसचा मोदींना सवाल

Organic Pesticide : जैविक कीटकनाशक ‘मेटाऱ्हायझियम’

Makhana Benefits : मखनाचे आरोग्यदायी फायदे

Rahul Gandhi : राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल, कोल्हापुरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

SCROLL FOR NEXT