Bajari Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Bajari Harvesting : बाजरीचे पीक येतेय मळणीवर; पेरणी क्षेत्र यंदा स्थिर

Bajari Threshing : खानदेशात बाजरीची पेरणी यंदा स्थिर आहे. पीक अनेक भागात मळणीवर किंवा पक्व झाले असून, त्यात लवकरच मळणीस सुरवात होणार आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात बाजरीची पेरणी यंदा स्थिर आहे. पीक अनेक भागात मळणीवर किंवा पक्व झाले असून, त्यात लवकरच मळणीस सुरवात होणार आहे. मध्यंतरी प्रतिकूल, पावसाळी वातावरणात पिकात अळ्यांची समस्याही तयार झाली होती. पण पीक जोमात आहे. बाजरीची पेरणी खानदेशात यंदा वाढेल, असे संकेत होते.

बाजरीची पेरणी धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, भडगाव या भागात बऱ्यापैकी झाली. अनेक भागात जलसाठे पुरेसे होते. साक्रीतील बुराई, शिंदखेड्यातील लहान-मोठे प्रकल्प भरले होते. गिरणा पट्ट्यात गिरणा धरणातून यंदा रब्बीसाठी पाणी मिळाले. भागातही बाजरीची पेरणी बऱ्यापैकी झाली.

तापीकाठी पसंती

तापी, अनेर नदीकाठी अनेक शेतकरी बेवड म्हणून बाजरीची पेरणी करतात. खानदेशात मुक्ताईनगर, जळगाव, यावल, अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात बाजरीची पेरणी बऱ्यापैकी झाली. यामुळे क्षेत्र सुमारे सुमारे सात हजार हेक्टरवर स्थिर राहिले. अनेकांनी केळी पिकाची काढणी १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर त्यात पूर्वमशागत करून ठिबकवर बाजरीची पेरणी केली.

पेरणी जानेवारीच्या मध्यात व अखेरीस झाली. जानेवारीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात पेरणी केलेले बाजरी पीक पक्व झाले आहे. त्यात मळणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मध्यंतरी खानदेशात गारपीट, वादळी पाऊस झाला. यामुळे पिकात तण वाढले.

काही भागात पीक वाकले होते. ते स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरणाने सरळ झाले आहे. पीकवाढीसाठी मागील महिन्यात दोन वेळेस शेतकऱ्यांनी दिली आहेत. ढगाळ वातावरण, पाऊस, गारपीट यामुळे पिकात काही भागात अळ्यांची समस्या फेब्रुवारीत तयार झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना फवारणी घ्यावी लागली. आता पीक हाती येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT