Bajari Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Bajari Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच; क्षेत्र स्थिर राहणार

Kharif Season : खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच आहे. यंदा क्षेत्र स्थिर राहू शकते. अनेकांनी कापूस लागवड कमी केली आहे. यामुळे बाजरीची पेरणी स्थिर राहील.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच आहे. यंदा क्षेत्र स्थिर राहू शकते. अनेकांनी कापूस लागवड कमी केली आहे. यामुळे बाजरीची पेरणी स्थिर राहील. खानदेशात सुमारे साडेनऊ हजार हेक्टरपर्यंत पेरणी जाऊ शकते, असा अंदाज आहे.

बाजरीची पेरणी खानदेशात साडेसहा हजार हेक्टरवर अपेक्षित होती. परंतु वेळेत पाऊस आल्याने मूग, उडीद, सोयाबीन, कापूस यांची पेरणी वेळेत झाली. अनेकांनी कापूस लागवड कमी केली आहे. चारा व धान्यासाठी बाजरीची पेरणी करण्यास शेतकरी पसंती देत आहेत.

यामुळे बाजरीची पेरणी स्थिर राहणार आहे. केळी पट्ट्यातही बेवडसाठी बाजरी पेरणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा भागात पपईची काढणी पूर्ण झालेल्या क्षेत्रात बेवडसाठी बाजरीची पेरणी झाली आहे.

तर रावेर, मुक्ताईनगर, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागांत केळी व इतर पिकांना बेवड, जमीन सुपीकता यासाठी बाजरीची पेरणी झाली आहे. काळ्या कसदार जमिनीत पेरणी अधिक आह. बाजरीचे दरही २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल, असे टिकून होते. चाऱ्यासही मागणी असते.

चाऱ्याचे दर वधारले आहेत. बाजरीचा चारा दुधाळ पशुधनाला सकस मानला जातो. यामुळे बाजरी पेरणीवर दूध उत्पादक व अन्य शेतकऱ्यांनी भर दिला आहे. बाजरी पेरणीस या महिन्यात सुरुवात झाली आहे.

मागील महिन्यात अनेकांनी आगाप पेरणी केली आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजरी पेरणीस वेग आला. पेरणी अद्यापही सुरू आहे. पेरणी पुढे सात ते आठ दिवस सुरू राहील, असेही संकेत आहेत.

जळगावातही पसंती

जळगाव जिल्ह्यात बाजरीची सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज आहे. तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर बाजरी असणार आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा, भडगाव, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा, धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे, नंदुरबारात शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार भागात बाजरीची पेरणी बऱ्यापैकी होईल. धुळ्यातील शिंदखेडा तालुका बाजरीत आघाडीवर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT