Bailgada Sharyat Agrowon
ॲग्रो विशेष

Bailgada Sharyat: पुन्हा एकदा भिर्रर्रर्रर्रर्र...

संतोष डुकरे 


- संतोष डुकरे


भंडार उधळणार आता घाटाघाटातून...
चौका वशिंडातून... काती शेपटावरुन...

जग जिकल्याच्या अविर्भावात
होतील लाखांचे सौदे
जहाल जित्राबासाठी
आणि गव्हाणीत पडतील शेंगदाणे
पेंड खुराकाची पोती रिती

पाटी पेन्सळ सोडून
पोरांच्या हाती परत कासरं येतील
बापाच्या नादासाठी
पोरं गुलाल खोबरं उधळतील... घाटाघाटात

शिक्यावरल्या टोपल्यात भाकर की तुकडा...
कुणास ठावूक...
बायको रानात का आजारात...
कुणास ठावूक...
पोरं मात्र बैलगाड्यामागं...
कधी अजान उत्साह, कधी सजान फरपट

गाडं बंद झालं म्हणून सुखावलेल्या बाया
गोठ्यातल्या गाया बाजारी गेल्यावर
हलगीच्या तालावर घाटात खिसं रितं झाल्यावर
कधी शिंगं तुटल्यावर, बैल मोडल्यावर
नवरा कासऱ्यात पाय अडकून सोलपटल्यावर
पोरगं गाड्याखाली सापडल्यावर
धनिकांच्या, नादिकांच्या छंदापायी, नादापायी
पावलोपावली गाळात चाललेलं घर पाहून
कडकडा बोटं मोडतील
उभ्या सरकाराच्या नावानं...

शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्यांचे मारेकरी
कदाचित तेव्हाही हसतील क्रूर अतिव समाधानानं
बैलाच्या नादात माणसांना गाड्याला जुपून
पुन्हा जुकाट खांदी मारल्याच्या आनंदान...

आमचे तथाकथित पुढारी तेव्हाही मश्गुल असतील
श्रेयाच्या राजकारणात... खाज खरूज गजकर्णात...

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mulshi Dam: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद

Ranbhaji Festival: हरितोत्सवासोबत रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद

Jalna Scam: जालना जिल्ह्यात २४ कोटींच्या घोटाळ्यात २८ जणांवर गुन्हे दाखल

Cotton Crop Protection: पावसानंतर कपाशीवरील रोग आणि किडींचे व्यवस्थापन

Dharashiv Rain: धाराशिव जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करा

SCROLL FOR NEXT