Team Agrowon
राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र, तामीळनाडू आणि कर्नाटकातील बैलगाडा शर्यतीवरीबाबतचा सर्वोच्च न्यायालयाने आज बैलगाडा मालक आणि शर्यत प्रेमींना मोठा दिलासा मिळाला होता.
महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीवर उच्च न्यायालयाने 2011 ला बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती.
त्यानंतर 20 एप्रिल 2012 रोजी महाराष्ट्र सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. यानंतर बैलगाडाप्रेमी बैलगाडा शर्यत सुरुवात करण्याबाबत आग्रही होते.
त्यानंतर बैलगाडा प्रेमींनी बैलगाडा शर्यत सुरू होण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर सर्वोच्च न्यायलयाने डिसेंबर 2021 मध्ये महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवण्याचा निकाल केला. त्यानंतर गावोगावी पुन्हा बैलगाडी शर्यत सुरू झाल्या.
आज सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बैलगाडी शर्यतीबरील बंदी उठवण्याचा निर्णय कायम ठेवून तामिळनाडू आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांनी आवश्यक अटी व शर्ती केल्या आहेत.