bacchu kadu Agrowon
ॲग्रो विशेष

Bacchu Kadu : संत्री निर्यातीला सबसिडी द्या ; बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Orange Export : संत्रा निर्यातीवर निर्बंध आल्याने केंद्र सरकारकडे राज्याने पाठपुरावा करण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी मुंबई येथे सोमवारी (ता. १६) मुख्यमंत्री एकनाथ पवार यांच्याकडे केली.

Swapnil Shinde

Amravati News : बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्कात वाढ केल्याने देशांतर्गत संत्र्याचे दर दबावात आले आहेत. परिणामी या प्रकरणात केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने त्वरित हस्तक्षेप करावा, त्यासाठी राज्याने पाठपुरावा करण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी मुंबई येथे सोमवारी (ता. १६) मुख्यमंत्री एकनाथ पवार यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत वाणिज्य मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. आता या प्रकरणी केंद्र काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यात १ लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. त्यामुळेच संत्रा हे विदर्भाचे मुख्य फळपीक ठरले आहे. राज्याची एकूण उत्पादकता पाच लाख टन आहे. टेबलफ्रूट म्हणून मान्यता असलेल्या नागपुरी संत्र्यावर अपेक्षित संशोधन झाले नाही. परिणामी याची टिकवण क्षमता कमी असल्याने निर्यातीला मर्यादा आहेत. बांगलादेश हा नागपुरी संत्र्याचा सर्वातमोठा आयातदार देश आहे. मात्र बांगलादेशने भारतीय आयात-निर्यात सातत्याने होणाऱ्या बदलाच्या धोरणाला जशास तसे उत्तर देत आयात शुल्कात प्रति किलो ८८ इतकी वाढ केली. त्यामुळे बांगलादेशची निर्यात ठप्प झाल्याने देशाअंतर्गत बाजारात दर दबावात आले आहेत. विशेष म्हणजे यंदा उत्पादकता कमी असतानाही हे घडले. संत्रा उत्पादकांना अवघा १५ ते २५ रुपये किलोचा दर मिळत आहे.

संत्रा उत्पादक मेटाकुटीस आल्याने याची गंभीर दखल घेत आमदार कडू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने मुत्सद्देगिरीचा वापर करीत याप्रकरणात तोडगा काढावा, त्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, असे कडू यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. बांगलादेशमधून भारतात आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर आयात शुल्क वाढवावे, अशी मागणी कडू यांच्याकडून करण्यात आली आहे.

बांगलादेशने आयात शुल्कात केलेल्या वाढीचा फटका संत्रा उत्पादकांना बसत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र हा प्रश्‍न केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील असल्याने मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या संदर्भात पत्र लिहीत राज्याची भूमिका मांडली आहे. संत्रा उत्पादकांना दिलासा मिळाला याकरिता निर्यात अनुदान देता येईल का? याचीही चाचपणी झाली पाहिजे. त्यासोबतच बांगलादेशमधून आयात होणाऱ्या शेतमाल व इतर वस्तूंवर शुल्कात वाढ करून दबाव टाकता येतो का? याबाबत निर्णय झाल्यास प्रश्‍न मार्गी निघेल. राजकीय मुत्सद्देगिरी देखील प्रभावी ठरणार आहे.
- बच्चू कडू, आमदार, प्रहार जनशक्‍ती पक्ष

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT