Bachhu Kadu Hunger Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Bachhu Kadu Protest : बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला नाशिकमधून ताकद

Farmer Loan Waiver : बच्चू कडू यांच्या मागण्यांची दखल शासनाने घ्यावी, यासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर हेही उपोषणास बसलेले आहेत. यासह पाठिंबा देण्यासाठी विविध कार्यकर्ते उपोषणस्थळी पहिल्या दिवसापासून उपस्थित आहेत.

Team Agrowon

Nashik News : शेतकरी कर्जमाफीसह विविध १७ मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख माजी मंत्री बच्चू कडू यांचे रविवारपासून (ता. ८) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी, गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यातून आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. यासाठी अनेक कार्यकर्ते उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. तर अनेक गावांमध्ये आता गावबंद तसेच चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. सरकारला जाग यावी व मागण्या मान्य कराव्यात, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

बच्चू कडू यांच्या मागण्यांची दखल शासनाने घ्यावी, यासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर हेही उपोषणास बसलेले आहेत. यासह पाठिंबा देण्यासाठी विविध कार्यकर्ते उपोषणस्थळी पहिल्या दिवसापासून उपस्थित आहेत. बागलाण, सिन्नर, निफाड, देवळा, येवला तालुक्यांतील कार्यकर्ते पाठिंबा देण्यासाठी गेलेले आहेत, असे निंबाळकर यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

गुरुवारी (ता. १२) चांदवड शहरातही बंदचे आवाहन केल्यानंतर उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. पाटोदा (ता. येवला) येथे ग्रामस्थांनी गावबंद आंदोलन केले. नाशिकमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने नाशिक रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ‘रास्ता रोको’ करण्यात आले. यासह सटाणा, चांदवड व मालेगाव तालुक्यांत अनेक ठिकाणी गावबंद तसेच चक्काजाम करण्यात येत आहे, अशी माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यातून खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे यांनी पाठिंबा पत्र दिले आहे. यासह आंदोलनाला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकरी या आंदोलनात आपापल्या भागातून सहभागी होत आहोत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. यासह छावा क्रांतीवर सेवा, नाशिक कर्जमुक्ती आंदोलनाने पाठिंबा दिला आहे.

ढोलबारे येथे ‘चक्का जाम’, ‘रास्ता रोको’

शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमुक्तिसाठी शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी विधवा व दिव्यांग घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. उपोषण सुरू होऊन सहाव्या दिवशीही राज्य सरकारने दखल न घेतल्याने शुक्रवारी (ता. १३) ढोलबारे (ता. बागलाण) येथे चौफुलीवर प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश काकुळते यांच्या नेतृत्वात विंचूर प्रकाशा मार्गावर चक्का जाम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी मेंढपाळ बांधवही मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हिरव्या मिरचीचे दर टिकून; ज्वारीला मागणी कायम, पेरुचा बाजार स्थिर, कारली दर टिकून तर हळदीचे दर स्थिर

Monsoon Rain: मराठवाड्यात २ दिवस पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, कोकणातही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

Sangli Rainfall: सांगली जिल्ह्यात पावसाची टक्केवारी घटली

Transformer Issues: बागायती पिकांत सिंचनास वेग, अनेक रोहित्र नादुरुस्त

Crop Insurance: जळगावात कापूस पीकविमा परतावा प्रलंबित

SCROLL FOR NEXT