Dr. Sharad Gadakh Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Award : ‘कृषी’तील योगदानासाठी डॉ. गडाख यांना पुरस्कार

Dr. Sharad Gadakh : डॉ. गडाख यांना त्यांच्या ज्वारी पिकाच्या विविध जातींच्या संशोधनासाठी शेती आणि शेतकऱ्यांसाठी भरीव योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

 गोपाल हागे

Akola News : विषमुक्त अन्न आणि स्वच्छ हवा, पाणी उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. ती ओळखून त्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे (कै.) कारभारी दादा गीते यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त नाशिक जिल्ह्यातील सोनोशी येथे कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा कृषी विज्ञान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्यासह इतरांना सन्मानित करण्यात आले.

गिते परिवाराच्या पुढाकाराने सोनोशी येथील कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानतर्फे कृषी आणि तत्सम संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी आयोजित सोहळ्यात डॉ. गडाख, निमज येथील प्रगतिशील शेतकरी तुकाराम गुंजाळ,

जुन्नर येथील गांडूळ खत प्रकल्पाच्या संचालिका काव्या दातखेडे यांना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, आदर्श सरपंच भास्कर पेरे-पाटील आणि डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

डॉ. गडाख यांना त्यांच्या ज्वारी पिकाच्या विविध जातींच्या संशोधनासाठी शेती आणि शेतकऱ्यांसाठी भरीव योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. सुभाष सांगळे, लक्ष्मण कुटे, पुंजाभाऊ सांगळे, गणपतराव सांगळे, सुदामराव सानप, राजेंद्र सानप, मोहन काकड, भगवान विलग, शंकरराव आव्हाड उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT