Automatic Silk Reeling Center Agrowon
ॲग्रो विशेष

Automatic Silk Reeling Center : रेशीम स्वयंचलित रिलिंग केंद्राला मंजुरी

Reshim Office Approval Granted : कोषोत्तर प्रक्रियेला चालना मिळावी या उद्देशाने रेशीम कार्यालयामार्फत स्वयंचलित (ऑटोमेटिक) रिलिंग केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : कोषोत्तर प्रक्रियेला चालना मिळावी या उद्देशाने रेशीम कार्यालयामार्फत स्वयंचलित (ऑटोमेटिक) रिलिंग केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. हे रिलिंग केंद्र खेड तालुक्यातील वरची भांबुरवाडी येथे उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील व विभागातील रेशीम उद्योगाला चालना मिळणार आहे.

राज्यातील हवामान रेशीम शेतीसाठी पोषक आहे. हमखास उत्पन्न मिळविण्यासाठी रेशीम उद्योग हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतकऱ्यांना तसेच रेशीम उद्योजकांना चालना देण्यासाठी २ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये एकात्मिक व शाश्‍वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ मधील स्वयंचलित रिलिंग मशिन, मल्टिएन्ड रिलिंग मशिन, ट्विस्टिंग युनिटकरिता शेड उभारण्यास अनुदान देण्याचा राज्य व केंद्र शासनाने निर्णय घेतला होता.

रेशीम उद्योगाच्या विकासासाठी राज्यात उत्पादित होणाऱ्या कोषावर प्रक्रिया करून धाग्यापर्यंत निर्मिती होण्यासाठी स्वंयचलित रिलिंग मशिन, मल्टिएन्ड रिलिंग मशिनरी, ट्विस्टिंग मशिनरीकरिता पात्र लाभार्थ्यांना शेड उभारणीसाठी नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सिल्क समग्र दोन या योजनेतून खेडमधील अभिजित जाधव यांना हे केंद्र मंजूर करण्यात आले आहे. ७५ टक्के अनुदान दिले जाणार असून, यामध्ये केंद्राचा ५० टक्के व राज्याचा २५ टक्के हिस्सा देण्यात येणार आहे.

येत्या सहा महिन्यांत हे रिलिंग केंद्र कार्यन्वित होणार आहे. जिल्ह्यात सुमारे एक हजार एकर क्षेत्र रेशीम उद्योगाखाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दर महिन्याला जास्तीत जास्त ५० हजार रेशीम अंडीपुजाचे वितरण होऊन त्यापासून साधारणपणे २०-२५ हजार किलो रेशीम कोषाचे उत्पादन होते. या सर्व कोषाची विक्री बारामती, बीड, जालना, रामनगर अशा ठिकाणी होत आहे.

जिल्ह्यात प्रकिया उद्योग नसल्याने हे सर्व जिल्ह्याबाहेरील व्यापारी उद्योजक घेतात. यापुढे हे केंद्र कार्यान्वित होत असल्याने बाहेर जाणाऱ्या कोषावर प्रक्रिया होणार आहे. या केंद्रासाठी दिवसाला एक टन रेशीम कोषाची आवश्यकता भासणार आहे. यामुळे तालुक्यातील रेशीम अर्थकारणाचा आलेख उंचाविण्यास हातभार लागणार आहे.

सध्या या केंद्रावर कोषापासून धागा तयार करण्याची यंत्रणा उभी राहणार असून, त्यापुढील काळात टप्प्याटप्प्याने धाग्याला पीळ देणे, रंग देणे, मुलायम वस्त्राची निर्मिती करणे इथपर्यंतचे विभाग येथे सुरू होणार आहे. केंद्रचालकांनी बंगळूर येथील केंद्रीय रेशीम मंडळाचे सीएसटीआरआय आणि धारवाड येथील केंद्रीय रेशीम मंडळाचे रिलिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यानुसार हे केंद्र मंजूर केले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तुती नर्सरी, व्यावसायिक चॉकी केंद्र, रिलिंग केंद्र, कोष खरेदी केंद्र, मुलायम वस्त्र निर्मिती केंद्रे उभारण्याचा मानस आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील रेशीम शेती उद्योगाची प्रगती होऊन रेशीमचे भरभक्कम जाळे विणले जाईल.
- संजय फुले, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, पुणे
रेशीम रिलिंग उद्योग सुरू करण्यासाठी मी नुकतेच प्रशिक्षण घेतले आहे. त्यानुसार मला हे केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे एक एकर क्षेत्रावर हे केंद्र असणार आहे. सद्यःस्थितीत रिलिंग केंद्राचे काम वेगाने सुरू आहे. येत्या तीन ते चार दिवसांत हे केंद्र सुरू होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे रेशीम उत्पादकांना बाहेर कोषाच्या विक्रीसाठी जाण्याची गरज भासणार नाही.
अभिजित जाधव, रिलिग केंद्रचालक, वरची भांबुरवाडी, खेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price: देशात कापसाचे दर नरमले

Maharashtra GSDP: राज्याचे स्थूल उत्पन्न होणार वर्षातून दोन वेळा प्रकाशित

Crop Compensation Issue: सुधारित पीकविमा योजनेमुळे भरपाईला ठेंगा

Fertilizer Shortage: देशातील खत टंचाईमुळे आयातीच्या हालचालींना जोर

Maharashtra Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT