Weather Station Agrowon
ॲग्रो विशेष

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

Rainfall Data : केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त योजनेतून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार आहे.

Team Agrowon

Sangli News : केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त योजनेतून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी गावागावांत पाच बाय सात मीटर एवढी जागा शोधली जात आहे. शासकीय जागेला प्राधान्य दिले जात आहे. या केंद्राचा शेतकऱ्यांसह कृषी विभागाला लाभ होणार आहे.

सध्या जिल्ह्यात ६९ मंडलांच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र आहे. बहुतांश वेळी अवकाळी पाऊस हा काही गावांत पडतो, अनेक ठिकाणी पडत नाही. त्या मंडल गावात पडला नाही, तर किती पाऊस झाला, याची अचूक नोंद होत नाही. पंचनामा करताना त्याची अडचण होते. त्यामुळे प्रत्येक गावात असे केंद्र उभारण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.

त्यासाठी केंद्राकडून ८०, तर राज्य शासनाकडून २० टक्के निधी दिला जाणार आहे. या केंद्राकडे केवळ ५ मीटर लांब व सात मीटर रुंद इतकी जागा लागणार आहे. त्यावर एक कट्टा बांधून तेथे हे यंत्र ठेवले जाईल. हे सौर ऊर्जेवर चालणारे यंत्र आहे. त्यामुळे विद्युत जोडणीची आवश्‍यकता भासणार नाही.

या केंद्रात जी माहिती साठवली जाईल, ती त्या क्षणाला ‘अपडेट’ होईल. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा, वायुदाब आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्या दिवसाचा पाऊस या नोंदी ठेवल्या जातील.

शेतीसाठी पावसाचा लाभ झाला, की अतिवृष्टीने नुकसान झाले, याची माहिती घेण्यास त्याचा उपयोग होणार आहे. अतिवृष्टीने नुकसान झाले आहे का, याचा पुरावा म्हणून या नोंदी महत्त्वाच्या असणार आहेत. एका एजन्सीद्वारे ही यंत्रणा हाताळली जाणार आहे.

जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतीच्या ठिकाणी हे केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. शासकीय जागा प्राधान्याने घेतली जाणार आहे. या केंद्राचा शेतीविकासात नक्कीच उपयोग होणार आहे.
- विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT