Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण २१ लाख ४२ हजार २३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २० लाख ६६ हजार १५० हेक्टर वर खरिपाची पेरणी झाली आहे.
झालेल्या या पेरणीत सर्वाधिक क्षेत्र कपाशीच असून, त्या पाठोपाठ सोयाबीन पेरणीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या कपाशीची लागवड सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ७९.३३ टक्केच आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ३ हजार ९०३ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ६ लाख ८३ हजार ३५४ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन १००.२१ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. दुसरीकडे जालना जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ५१ हजार १७३.८४ हेक्टर असताना प्रत्यक्षात ६ लाख ३४ हजार १७६ हेक्टर म्हणजे ९७.३९ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे
बीड जिल्ह्यात खरिपाची सर्वसाधारण क्षेत्र आठ लाख ८ हजार ९४५ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७ लाख ४८ हजार ६१९ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९२.५४ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या पीकांपैकी ज्वारी, बाजरी, तूर, उडीद व कपाशी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.
सोयाबीन फांद्या लागणे ते फूल धरण्याच्या अवस्थेत आहे. मकाचे पीक वाढीच्या ते पोंगा अवस्थेत असून मकावर काही ठिकाणी लष्करी अळीचा, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कपाशीवरही काही ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
५ लाख ९९ हजार ४७० हेक्टरवर सोयाबीन
छत्रपती संभाजी नगर जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण ५ लाख १२ हजार २८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात ५ लाख ९९ हजार ४७० हेक्टर म्हणजे सुमारे ११७.०८ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.
पेरणी झालेल्या सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३२,२६० हेक्टर जालन्यातील ५ लाख ११ हजार ५१८ हेक्टर, तर बीडमधील ३ लाख ५५ हजार ६९१ हेक्टर सोयाबीन क्षेत्राचा समावेश आहे. तीनही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन सोयाबीनची पेरणी झाली आहे.
कपाशी ८ लाख २० हजार हेक्टवर
तीनही जिल्ह्यांत कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख ३४ ह्जार ७४८ हेक्टर असताना प्रत्यक्षात ८ लाख २० हजार ८६४ वर कपाशीची लागवड झाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ लाख ९२ हजार ४३६ हेक्टर, जालन्यात २ लाख ८६ हजार २७२ हेक्टर, तर बीडमध्ये लागवड झालेल्या २ लाख ४२ हजार १५६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
पिकांची अवस्था व समस्या
वाढीच्या अवस्थेत : ज्वारी, बाजरी, तूर, उडीद, कपाशी
फुलावर/फांद्या लागण्याच्या अवस्थेत : सोयाबीन
मक्याचे पीक : वाढीपासून पोंग्यापर्यंत काही ठिकाणी लष्करी अळी व पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव
कपाशी : काही ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव
एकूण पेरणीचे क्षेत्रफळ (खरीप २०२५)
सर्वसाधारण क्षेत्र: २१,४२,०२३ हेक्टर
प्रत्यक्ष पेरणी: २०,६६,१५० हेक्टर
पेरणीचे प्रमाण: सुमारे ९६.४५%
इतर पिकांचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
खरीप ज्वारी ५३९
बाजरी ४०२७०
मका ३४१९९६
इतर तृणधान्य ११२८
तूर १५०२७१
मूग ३८४७८
उडीद ६१४५५
इतर कडधान्य ७५४
भुईमूग १०,१४६
तीळ ३४०
कारळ १५
सूर्यफूल १४
इतर गळीतधान्य ४०८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.