Spinning Industry Agrowon
ॲग्रो विशेष

Spinning Mills Auction: पाच सूत गिरण्यांचा तिसऱ्यांदा लिलाव; जिल्हा बँकेचे १३४ कोटी अडकले!

Maharashtra Cooperative Mills: सांगली जिल्ह्यातील पाच सहकारी सूत गिरण्यांवरील थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. १३४ कोटींहून अधिक थकबाकी असून, याआधी दोनदा लिलावाला कमी प्रतिसाद मिळाल्याने तो रद्द करावा लागला होता.

अभिजीत डाके

Sangli News: सांगली जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित पाच सूत गिरण्यांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकित कर्ज वसुलीसाठी मालमत्ता विक्रीसाठी तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. या सूतगिरण्यांकडे तब्बल १३४.४२ कोटी रुपयांचे मुद्दल येणे असून त्यावरील व्याज वेगळे आहे. बँकेने याआधी दोनदा सूत गिरण्यांचा लिलाव जाहीर केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यापैकी तीन सूत गिरण्या बॅँकेने खरेदी केल्या आहेत.

कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बॅँकेने स्वामी रामानंद भारती सहकरी सूतगिरणी तासगाव, खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल्स, विटा, शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी इस्लामपूर, प्रतिबिंब मागासवर्गीय को-ऑप. इंडस्ट्रीज, इस्लामपूर व विजयालक्ष्मी कॉटन मिल्स, आटपाडी या पाच सूत गिरण्यांची मालमत्ता विक्रीसाठी निविदा मागवल्या होत्या.

या सर्व सूत गिरण्यांकडे डिसेंबर-२०२४ अखेर केवळ मुद्दलाची १३४ कोटी ४२ लाख ५२ हजार रुपये थकबाकी आहे. थकित व्याजही कोट्यवधी रुपयांत आहे. या संस्थांच्या लिलावासाठी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी होती. मात्र केवळ एकच निविदा दाखल झाली. त्यामुळे प्रक्रिया रद्द करावी लागली.

स्वामी रामानंद भारती सहकरी सूत गिरणी (तासगाव) ४५.८१ कोटी, शेतकरी विणकरी सूत गिरणी (इस्लामपूर), ४९.३१ कोटी, खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल्स (विटा) १७.९९ कोटी, प्रतिबिंब मागासवर्गीय इंडस्ट्रीज (इस्लामपूर) ७.५५ कोटी व विजयालक्ष्मी कॉटन मिल्सच्या (आटपाडी) १३.७४ कोटी रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. बॅंकेने ‘सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट’अंतर्गत या सर्व सूतगिरण्या ताब्यात घेतल्या आहेत.

काही वर्षांपासून त्यांच्याकडील थकबाकी कायम आहेत. याआधी या सर्व संस्थांचा लिलाव जाहीर केला होता. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. शेतकरी विणकरी, प्रतिबिंब मागासवर्गीय व विजयालक्ष्मी कॉटन मिल या तीन सूत गिरण्या जिल्हा बॅँकेने मार्च-२०२० मध्ये स्वत: खरेदी केल्यात.

बॅँकेने खरेदी केलेल्या कर्जदार संस्थांची सात वर्षांत विल्हेवाट लावून बॅँकेची कर्ज वसुली करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. या संस्था खरेदी करून मार्चमध्ये ५ वर्षे पूर्ण होत आहेत. या संस्थांकडील कर्जवसुली कोणत्याही स्थितीत बॅँकेला करावी लागणार आहे. त्यामुळे बँकेने तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT