Aatma Employee Welfare Associtation Agrowon
ॲग्रो विशेष

Aatma Employee Issue : असा काय गुन्हा केला, काही समजेना साहेब

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : आपल्या राज्यात सर्वसाधारण कामगारास दरवर्षी वाढीव वेतन देता. परंतु आमच्याच बाबतीत काय अडचण आहे हेच लक्षात येत नाही. या त्या विभागात फाइल अडकली आहे, असे वारंवार सांगितले जाते. या अडचणीमुळे आजवर आत्मा कर्मचाऱ्‍यांना न्याय मिळाला नाही. ५१८ कर्मचाऱ्यांनी असा काय गुन्हा केला, काही समजेना साहेब, असा भावनिक सवाल आत्मा एम्पलॉई वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्राने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केला आहे.

पत्रात म्हटले, की कृषी विभागातील आत्मा कंत्राटी कर्मचारी हे १२ ते १५ वर्षापासून कृषी विभागात शासकीय नियमानुसार विनाखंड सेवा करीत आहेत. कृषी विभागामध्ये एकूण संवर्ग गटातील ‘ब’ व ‘क’ या पदांची मंजूर पदे २७ हजार ४५३ आहेत. त्यापैकी सद्यः स्थितीत ८ हजार ६६३ पदे कृषी विभागात कार्यरत आहे. कृषी विभागांने सवर्ण ‘क’ गटातील पदांची २०२२- २३ मध्ये जाहिरात दिली आहे.

त्यानुसार २३२७ एवढे पद भरणार आहे. २०२३-२४ मधील रिक्त पदे १६ हजार ४६३ सद्यःस्थितीत आहेत. कृषी विभागामध्ये २०१० पासून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या योजनेतंर्गत विभागीय कृषी सहसंचालक यांच्या मार्फत जिल्हानिहाय व तालुकानिहाय ३ पदांची नियुक्ती केली आहे. जिल्हास्तरावर कंप्यूटर प्रोग्रॅमर (१ पद) व तालुकास्तरावर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (१) आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (३ पदे) असे एकूण ५१८ पद हे ज्येष्ठता व रोस्टर प्रमाणे शासकीय नियमानुसार नियुक्त आहेत. दुसरीकडे २०२१ पासून आत्मा कर्मचाऱ्यांचे वेतन हे अर्ध्यावर आणले आहे.

उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबादमध्ये दाखल केलेल्या याचिकेवरील २९ एप्रिल २०२२ च्या निर्णयातील पृष्ठ क्र.५ मधील क्र. १ व २ च्या आदेशान्वये ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत महाराष्ट्र शासनाला, न्यायालयात आत्मा संघटनेमार्फत शासकीय सेवा सुविधा सह समायोजन, निवृत्ती पश्चात लाभ तसेच सद्यःस्थितीतील मानधन वाढ बाबत निवेदित केलेल्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आदेशित केलेले आहे.

त्या पूर्ण न झाल्यास परत न्यायालयात दाद मागन्याकरीता मुभा देण्यात आलेली आहे. आत्माच्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा, अपघात/वैद्यकीय आणि नैमित्तिक रजा लागू नाहीत.अनेक कर्मचारी मृत्यू पावले, त्यांना कुठलाही लाभ मिळालेला नाही. त्यांची पारिवारिक परिस्थिती लक्षात घेता संघटनेमार्फत मदत निधी उभारून त्यांच्या परिवारास मदत करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांनाच कमालीच्या आर्थिक, पारिवारिक व सामाजिक विवंचनेतून सामोरे जावे लागत आहे.

आत्माच्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव, सेवा कालावधी, कर्तव्य व जबाबदाऱ्या नुसार योग्य दर्जा देऊन, आत्मा व कृषी विस्ताराच्या योजनांच्या अंलबजावणी करिता आत्मा अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवा नियमितीकरण, सेवानिवृत्ती पश्चात लाभ तसेच केलेल्या पगार कपाती बाबत शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय घ्या अशी मागणी आत्मा एम्पलॉई वेल्फेअर असोसिएशनने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT