Indian Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest: मूर्तिजापुरात कर्जमाफीसाठी शुक्रवारी ‘आठवण’ मोर्चा

Murtijapur March: मूर्तिजापुरातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेत 'आठवण मोर्चा' काढण्याची घोषणा केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मोर्चात शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आणि अन्य आर्थिक मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.

 गोपाल हागे

Akola News: निवडणुकीत कर्जमाफीबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची आठवण म्हणून शुक्रवारी (ता. २१) मूर्तिजापूर तालुक्यातील प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप, यंग बॉइज क्लब मूर्तिजापूर, जनमंच, आंतरभारती यांच्या पुढाकाराने ‘आठवण मोर्चा’ काढला जाणार आहे. या बाबत प्रशासनाला यापूर्वीच इशारा देण्यात आला आहे.

या मोर्चामध्ये शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर आदी वाहने घेऊन सहभागी होणार आहेत. त्याचदिवशी प्रत्येक कर्जदार शेतकरी आपले वैयक्तिक निवेदन व आपल्याकडे असलेल्या बँकेच्या कर्जाच्या रक्कमेचा अर्ज भरून मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत. वचन पूर्तीसाठी यापूर्वी दोन निवेदन देऊन या बाबत शासनाला अवगत केलेले आहे.

येत्या ३ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कर्जमाफीच्या निधीची तरतूद करावी व कर्जमाफीची घोषणा करून ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून नवीन कर्ज वाटप होण्यास पात्र करावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रोत्साहन निधी द्यावा, या वर्षीचा सोयाबीन पीकविमा त्वरित घोषित करून जून महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, शेती साहित्यावरील जीएसटी रद्द करावा, शेतकुंपणासाठी १५ वर्षे कर्जफेडीचे धोरण आखण्यास रिझर्व्ह बँक व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, वयोवृद्ध शेतकरी, शेतमजुरांना १० हजार मासिक पेन्शन सुरू करावे, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे.

...तर शेतकरी बसतील उपोषणाला

अर्थसंकल्पात कर्जमाफीच्या निधीची तरतूद केली नाही तर तालुक्यातील १५० गावांतील शेतकरी बेमुदत उपोषणाला बसतील, असा इशारा प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे, ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष कैलास साबळे, जनमंचचे प्रा. सुधाकर गौरखेडे, आंतर भारतीचे प्रमोद राजनदेकर, सेवकराम लहाने, श्रीकृष्ण गुल्हाने, जगदीश जोगळे, मधुकर उघडे, प्रकाशसिंग राजपूत, अनिकेत खोत, प्रफुल्ल मालधुरे, संतोष रुद्रकार, हरनामसिंग बाजोरे, हरिभाऊ वानखडे, अनिल राठोड आणि अरुण बोंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Fake Seeds: अहिल्यानगरमध्ये बोगस कपाशी बियाण्यांचा गैरप्रकार; शेतकऱ्यांचे नुकसान, शासनाचे कडक कारवाईचे आश्वासन

Kharif Sowing : मराठवाड्यात ४५ लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी

Mangrove Conservation : कांदळवन संवर्धनातून साकारतेय हरित अर्थव्यवस्था

Improved Crop Variety : महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे विकसित पिकांचे सुधारित वाण

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ नव्हे, हा तर स्वार्थपीठ महामार्ग : राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT