Maharashtra Zilla Parishad Panchayat Samiti Election Postponed: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आहेत. या निवडणुकांसाठी आता ७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल आणि मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. ७ फेबुवारी रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० दरम्यान मतदान होईल. तर ९ फेब्रुवारी रोजी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल..जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी मतमोजणी होणार असल्याचे याआधी निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. पण आता निवडणूक आयोगाने या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलत सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे, जिथे या निवडणुका होणार आहेत. .राज्य निवडणूक आयोगाचे १३ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हा कार्यालयांनी २७ जानेवारी रोजी उमेदवारी मागे घेणे आणि चिन्ह वाटपानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता मतदान, मतमोजणी हे टप्पे पार पडणे शिल्लक आहे..ZP Election: अतिरिक्त यंत्रांची व्यवस्था.सर्वोच्च न्यायालयाने १२ जानेवारी २०२६ रोजी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ च्या पुढे दोन आठवड्याची मुदत दिली आहे. पण, २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने राज्यात २८ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला..Kolhapur ZP Election: दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर एकत्र लढणार, भाजप विरुद्ध सामना रंगणार.यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना सदर कालावधीत प्रचार करणे सोयीचे होणार नाही. तसेच मतदान आणि मतमोजणी आदी निवडणूक टप्पे निश्चित केलेल्या तारखेस पार पाडणे शक्य होणार नाही. यामुळे या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरु असून, निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत तो लागू राहील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. .निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरु असून, निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत तो लागू राहील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.