Economic Survey 2026 Urea Price Hike: शेती शाश्वत बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार खत अनुदान प्रणालीत बदल करण्याची तयारीत आहे. तसे संकेत आज संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून देण्यात आले आहेत. आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये युरियाच्या किरकोळ दरात थोडीशी वाढ सूचवण्यात आली आहे. मार्च २०१८ पासून युरियाच्या ४५ किलोच्या युरिया पिशवीचा दर २४२ रुपये इतका जैसे थे आहे. हा दर थोडा वाढवून, त्या वाढीइतकी रक्कम प्रतिएकर प्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करावी, असे आर्थिक सर्वेक्षणात नमूद केले आहे..जेव्हा खताच्या किमती गरजेपेक्षा अधिक स्वस्त होतात; तेव्हा त्याचा अनावश्यक वापर अधिक केला जातो. गेल्या दशकभरात युरियाचा दर स्थिर राहिला. यामुळे हे सर्वात स्वस्त खत बनल्याने त्याचा शेतीसाठी वापर सातत्याने वाढत चालला असल्याचे नमूद करण्यात आले..गेल्या तीन दशकांपासून खतांच्या वापरात निर्माण झालेला असमतोल दुरुस्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. खताच्या वापरातील असमतोलामुळे मातीचा दर्जा खालावत चालला आहे आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याची बाब सर्वेक्षणातून निदर्शनास आणून देण्यात आली आहे..Economic Survey 2025: शेती विकास दर घटला; आर्थिक सर्वेक्षणात आव्हानांवर भर.भारतीय शेतकऱ्यांनी शेतीत वापर केलेल्या नायट्रोजन-फॉस्फरस-पोटॅशियम (N:P:K) चे प्रमाण २००९-१० मधील ४:३.२:१ च्या तुलनेत बिघडून २०२३-२४ मध्ये १०.९:४.१:१ इतके झाले आहे. अनुदानित युरियामुळे नायट्रोजनचा वाढलेला अतिवापर हे या असमतोलाचे मुख्य कारण असल्याचे सर्वेक्षणात अधोरेखित केले आहे. शेती तज्ज्ञांच्या मते, बहुतांक शेतपिके आणि मातीच्या प्रकारांसाठी हे प्रमाण ४:२:१ च्या जवळ असायला हवे..Economic Survey 2025 : कृषी क्षेत्रासमोर सिंचन, पायाभूत सुविधा आणि हवामान बदलाचे आव्हान: आर्थिक सर्वेक्षण अहवाल.अधिक शाश्वत सुधारणांसाठी, खतांबाबतचे निर्णय प्रशासकीय पातळीवर ठरवलेल्या किंमतीपेक्षा मातीचे आरोग्य आणि पिकांच्या गरजांवर आधारित असले पाहिजेत. त्यासाठी खत खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य वेगळे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे..या सर्वेक्षण अहवालातून, नायट्रोजनच्या अतिवापरामुळे मातीतील सेंद्रिय घटक कसे कमी होतात? सूक्ष्म पोषक घटकांचा नाश, मातीचा दर्जा खालावणे आणि नायट्रेट मातीमधून पाण्यासोबत भूगर्भात कसे झिरपत आहे? याकडे लक्ष वेधून घेण्यात आले आहे. अनेक सिंचनखालील क्षेत्रांत खतांना मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे. यातून कृषी निविष्ठांचा कमी वापर नाही तर पोषक तत्वांचे चुकीचे प्रमाण दर्शवते, असे म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.