Solapur News: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २७) ६०४ गाड्या कांदा विक्रीसाठी आला होता. २६ जानेवारीच्या सुट्टीनंतरही आवक मर्यादितच होती, पण भाव खूपच पडला. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सरासरी ८०० रुपयांचा भाव मिळाला. चांगल्या कांद्याला १७०० ते १९०० रुपयांपर्यंतच भाव होता..दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या काळात सोलापूर बाजार समितीत कांद्याला सरासरी १५०० ते २५०० रुपयांपर्यंत भाव असतो. मात्र, यंदा कांद्याला मागणी नसल्याने आणि निर्यातीवर निर्बंध असल्याने भावात अपेक्षित सुधारणा झाली नाही. मंगळवारी सोलापूर बाजार समितीत आलेल्या ६० हजार ४३२ क्विंटल कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना किमान सहा ते सात कोटी रुपये मिळतील, अशी आशा होती..Onion Price: अहिल्यानगरमधील कांदा उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा.मात्र, भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती अवघे पावणेपाच कोटी रुपयेच पडले. अजूनही जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर कांदा असून उत्पन्नाच्या प्रमाणात खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकरी कांदा जमिनीत गाडण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे बंगरुळूच्या बाजारात कांद्याला सोलापूरच्या तुलनेत प्रतिक्विंटल ७०० रुपये ते एक हजार रुपये जास्त भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा तिकडे हलविला आहे. .Onion Prices: केंद्राच्या धोरणांचा कांदा उत्पादकांना २०२५ वर्षात फटका, कर्जबाजारीपणा वाढला, कांदा उत्पादक संघटनेचा गंभीर आरोप.त्याठिकाणी विकलेल्या कांद्याचे पैसे लगेच मिळतात. सोलापूर बाजार समितीत मात्र व्यापाऱ्यांकडून १० हजार रुपयांपर्यंत उचल देऊन बाकीच्या रकमेसाठी १५ ते २० दिवसांच्या मुदतीचा धनादेश दिला जातो. आता कांद्याचे दर वाढण्याची शक्यता धूसर असल्याचे बाजार समितीतील अधिकारी सांगतात. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून त्यांनी राज्य सरकारकडून प्रतिक्विंटल अनुदानाची मागणी केली आहे..येथून येतोय कांदासोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर, पुणे, धाराशिव, अहिल्यानगर, सातारा, बीड या जिल्ह्यातून कांदा बाजारात येत आहे. अतिवृष्टी, महापूर येऊन गेल्यावर अनेक शेतकऱ्यांनी दोन पैसे मिळतील या आशेने कांदा लागवड केली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.