Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : जायकवाडीत फक्त १५.१९ टक्के पाणीसाठा; टप्प्या टप्प्याने बंद होणार १० हजार कृषी पंप 

Agricultural Pumps : राज्यात सध्या जलसंकट गडद होत आहे. प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होताना दिसत असून पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने यंदा तहाण भागवण्यासाठी सर्वसामान्यांना कसरत करावी लागत आहे. विविध जिल्ह्यांतील गाव पाड्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून पाण्याच्या एका हंड्यासाठी महिलावर्गाला पायपीट करावी लागत आहे. यादरम्यान आता मराठवाड्याची जीवनदायनी आसणाऱ्या जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा १५.९१ टक्के शिल्लक राहीला आहे. यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. तर येत्या काळात अती तीव्र पाण्याचीटंचाई झाल्यास टप्प्या टप्प्याने १० हजार कृषी पंप बंद करण्यात येणार आहेत. यामुळे छ. संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

अख्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात यंदा चांगलीच घट झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जायकवाडी धरणात ५२.३६ टक्के असणारा पाणीसाठा यंदा मात्र १५.९१ टक्क्यांवर आला आहे. यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट घोंगावत असून धरणातील पाणी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केले जाणार आहे. 

सध्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा कमी होत चालला आहे. अशीच स्थिती राहिल्यास पाणी पातळी पाहून धरणावरील कृषी पंपांचा कालावधी कमी केला जाईल. सध्या आठ तास कृषी पंपासाठी वेळ देण्यात आला आहे. पाणी संकट उद्भवल्यास महावितरणशी चर्चा करून तो कालावधी चार तासांवर आणला जाणार आहे. तसेच हवामान विभागाच्या येणाऱ्या अंदाजानुसार पुढील निर्णय घेतले जातील. पण कोणत्याही स्थितीत कृषी पंप लगेच बंद केले जाणार नसून ते टप्प्या टप्प्यांनी बंद केले जाणार आहेत. 
- प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथसागर (उत्तर) 

दरम्यान धरणातील पाणी परळी येथील औष्णिक केंद्रातून वीज निर्मिती केंद्रासाठी मार्च महिन्यात सोडण्यात आले आहे. या पाण्यातूनच तीन दिवसांत ढालेगाव बंधाऱ्यांत देखील पाणी सोडले जाणार असून वीज निर्मितीसह जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. 

यंदाची दुष्काळी स्थिती पाहता गोदावरी खोऱ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे छ. संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे १० हजार कृषी पंप बंद टप्प्या टप्प्याने बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. 

टँकरचा आकडा १ हजार पार 

मराठवाड्याची तहान जायकवाडी धरणातून भागवली जाते. मात्र मागील वर्षी सरासरीपेक्षा पाऊस न झाल्याने मराठवाड्यात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. तर वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात टँकर ने पाणीपुरवठा केला जात असून टँकरचा आकडा १ हजारी पार गेला आहे. मराठवाड्यातील ७२० गावे आणि २३७ वाडयांना १ हजार ६३ टँकर पाणीपुरवठा करत आहेत. सगळ्यात जास्त टँकर छत्रपती संभाजी नगरमध्ये लागत असून येथे ४४३ टँकर सुरु आहेत. 

जिल्हा आणि टँकरची संख्या 

छत्रपती संभाजीनगर - ४४३ टँकर

जालना - ३४३ टँकर

बीड - ११९ टँकर

परभणी - १ टँकर

नांदेड - ३ टँकर

लातूर - ८ टँकर

धाराशिव - ६६ टँकर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT