Assembly Constituency Election : महाराष्ट्र विधानसभेसाठी सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून पहिल्या फेरीतील कल हातील आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी आघाडी घेतली आहे. तर कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत असून पहिल्या फेरीमध्ये समरजितसिंह घाटगे १ हजार १३० मतांनी आघाडी घेतली होती परंतु दुसऱ्या फेरी अखेर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुसंडी मारत २ हजार ४०० आघाडी घेतली आहे.
दरम्यान इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार राहुल आवाडे आघाडीवरती असून त्यांना ६ हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर राधानगरी विधानसभा मतदार संघातून प्रकाश आबिटकर यांनी १ हजार २२ मतांनी आघाडीवरती आहेत. शिरोळ विधानसभा मतदारसंघांचे महायुती पुरस्कृत उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर हे ३ हजारांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी असलेल्या कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी २ हजार ५०० मतांची आघाडी घेतली आहे.
सांगली जिल्ह्यातील हायव्होल्टेज समजल्या जाणाऱ्या सांगली विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी ५ हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर खासदार विशाल पाटील यांच्या नातेवाईक असलेल्या जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली होती. इस्लामपूर मतदारसंघाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिल्या फेरी अखेर १ हजार २०० मतांनी आघाडी घेतली आहे. तर पलूस कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी आघाडी कायम ठेवत जोरदार मुसंडी मारली आहे.
दुसऱ्या फेरी अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील कल असे आहेत.
कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर ४ हजार २०० मतांनी आघाडीवर
राधानगरी विधानसभामधून प्रकाश अबिटकर २ हजार ९९५ आघाडीवर
कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ २ हजरा ४०० मतांनी आघाडीवर
इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून राहुल आवाडे ९ हजार ९२३ मतांनी आघाडीवर
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून अमल महाडिक २ हजार ६१२ आघाडीवर
शिरोळ विधानसभा मतदार संघातून राजेंद्र पाटील यड्रावकर पहिल्या फेरी अखेर ५ हजार ४ मतांनी आघाडी घेतली आहे.
शाहूवाडी विधानसभा मतदार संघातून माजी आमदार ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांनी किरकोळ मतांची आघाडी घेतली आहे.
चंदगडमधून अपक्ष उमेदवार असलेल्या शिवाजी पाटील यांनी १ हजार ०२५ मतांनी आघाडीवर
करवीर विधानसभा मतदार संघातून राहुल पाटील २०० मतांनी आघाडीवर (पहिली फेरी)
हातकणंगले विधानसभा मतदार संघातून अशोकराव माने मतांनी आघाडीवर (पहिली फेरी )
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.