
Pune News : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज (ता. २३) सुरूवात झाली आहे. राज्यातील २८९ मतमोजणी केंद्रांवर पोस्टल मतमोजणी झाली असून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर आहेत. तर उपमुख्यमंत्री पवार यांची वाटचाल खडतर असल्याचे समोर आले आहे. येथे पोस्टल मतमोजणीत पुतणे युगेंद्र पवार आघाडीवर आहेत.
राज्यात निवडणुकीत कोण बाजी मारणार? कोणाची सत्ता येणार? याकडे अख्या देशाचे लक्ष लागून राहीले आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले असून ६५ टक्के मतदान झाले आहे. तर ईव्हीएम मशीनमध्ये राज्यातील ४ हजार १३६ उमेदवारांचं भवितव्य कैद झाले होते. आजच्या मतमोजणीतून कोण विधानसभेत जाणार हे स्पष्ट होणार आहे.
आज मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली असून पोस्टल मतमोजणीत पहिल्या कलांमध्ये महायुती आघाडीवर दिसत आहे. पहिल्या फेरीमध्ये महायुती १०२ जागांवर तर महाविकास आघाडी ८३ जागांवर आघाडीवर असून इतर ११ जागांवर आघाडीवर आहेत.
पहिल्या कलांमध्ये ठाण्याच्या कोपरी पाचपाखडी येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत. केदार दीघे पोस्टल मतदानामध्ये पिछाडीवर आहेत. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भातील नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. पण बारामधीमधून अजित पवार यांना धक्का बसला असून ते पिछाडीवर आहेत. येथे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार आघाडीवर आहेत.
बीडमधून धनंजय मुंडे पहिल्या फेरी अखेर ३००० मतांनी आघाडीवर असून माहीमच्या पहिल्या कलात अमित राज ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मनसेच्या गोटात जल्लोष साजरा केला जात आहे. पुण्याच्या कसबा पेठ मतदार संघात रविंद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.