VidhanBhavan Agrowon
ॲग्रो विशेष

Assembly Work Closed : ध्वनिक्षेपकात बिघाडामुळे विधानसभा तहकूब

Vidhansabha Update : आज विधानसभेतील अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणाच खराब झाल्याने अर्धा तास कामकाज बंद करावे लागण्याची नामुष्की अध्यक्षांवर ओढवली.

Team Agrowon

Mumbai News : विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षाने तर कधी सत्तारूढ पक्षाने केलेल्या गोंधळाने सभागृह बंद करण्याची परंपरा आहे. मात्र आज विधानसभेतील अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणाच खराब झाल्याने अर्धा तास कामकाज बंद करावे लागण्याची नामुष्की अध्यक्षांवर ओढवली. ‘माईक वारंवार का बिघडतो याची एसआयटी’ चौकशी लावण्याची मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली.

गेल्या पाच वर्षांपासून राज्याच्या मुंबईतील विधानमंडळात दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरूच आहे, अध्यक्ष बदलले तरी ते वेगवेगळ्या मार्गातून सुरूच राहिले आहे. नवीन अध्यक्षांच्या काळात विधानसभा सभागृहाची ध्वनी यंत्रणा बदलून टाकण्यात आली आहे. आधीची उत्तम दर्जाची बॉश कंपनीची यंत्रणा बदलून त्या जागी ब्राहलर या अन्य कंपनीची यंत्रणा लावण्यात आली आहे.

ही यंत्रणा बदलून टाकण्यात आल्यानंतर ती कायमच गाजत राहिली आहे, अनेकवेळा त्यात दोष आढळले आहेत, अनेकवेळा त्यातून चित्रविचित्र आवाज ऐकू येतात, बऱ्याचवेळा माईक सुरूच होत नाही. खरखर येते. मंगळवारी अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा माईकच बंद पडल्याने गोंधळ झाला होता. अजित पवार यांच्या भाषणाचा सुरुवातीला स्पष्ट आवाजच येत नसल्याची सदस्यांनी ओरड केली.

बंद माईकवरून टोलेबाजी

बुधवारी (ता. २८) काँग्रेसचे आमदार पटोले बोलायला उभे राहिल्यावर माईक मधून किरकिर आवाज यायला लागला. अखेरीस नाना पटोले यांनी मीच बोलायला लागल्यावर माईकमधून आवाज का येतो? याची एसआयटी लावून चौकशी करा, असा चिमटा समोरच्या बाकावर बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढला. त्यावर समोर बसलेल्या फडणवीस यांनी तुमच्या माईकमध्ये व्हायरस घुसल्याने असे झाल्याचा टोला लगावला.

त्यावर ‘तो व्हायरस तुम्हीच घुसवला आहे, म्हणूनच एसआयटी चौकशी करा’ अशी मागणी केल्याचे उत्तर पटोले यांनी दिले. या दोघांच्या जुगलबंदीमध्ये विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर देखील सहभागी होत, ‘व्हायरस घुसवण्याचे कटकारस्थान कोणी रचलंय त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे’ असल्याचे सांगत गुगली टाकली. अखेरीस वारंवार ध्वनी यंत्रणा सतत त्रास देतच राहिल्याने अखेर सभागृहाचे कामकाज २५ मिनिटांसाठी तहकूब केले, त्यानंतर पुन्हा यंत्रणा तपासून काम सुरू करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: ज्वारीचा भाव टिकून; गवार तेजीत, जांभळाला उठाव, मुग दबावात, सोयाबीन दर मंदीत

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्यांना विलंब नको

Urea Shortage : युरियाच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी त्रस्त

Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’मधून वीजबिलात १२० रुपयांची सवलत

Khandesh Water Crisis : टँकर घटले; काही भागांत टंचाई कायम

SCROLL FOR NEXT