Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Reservoir : आष्टी तलाव ७२ टक्के भरला, आता सांडव्याला पाणी सोडणार

Rain Update : मोहोळ तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील आष्टी तलावात ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Team Agrowon

Mohol News : मोहोळ तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील आष्टी तलावात ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. तलावातील या पाणीसाठ्यामुळे परिसरातील गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, तलावाच्या सांडव्याला आता पाणी सोडले जाणार असून, परिसरातील गावांना सावधानतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

मोहोळ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा मध्यम प्रकल्प आहे. उजनी धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडले आहे, याच पाण्याने आणि गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे- आष्टी तलावातील पाणीसाठा ७२ टक्के झाला आहे. त्याशिवाय मोडनिंब, अरण, भेंड, तेलंगवाडी या परिसरातील गावांच्या ओढ्याचे पाणी ही आष्टी तलावात येते.

त्यामुळे कमी कालावधीत तलावातील पाणीसाठा वाढला. दरम्यान, तलावात कालव्यातून पाणी सोडणे बंद केले आहे, तलावात येणाऱ्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर आष्टी सांडवा व डावा कालवा यातून पाणी सोडले जाऊ शकते. आष्टी तलाव परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या वस्त्या आहेत. तसेच त्या ठिकाणी त्यांची शेती, शेतीला लागणारी अवजारे, जनावरे आहेत.

कोणालाही धोका होणार नाही, यासाठी येवती, रोपळे, बाभूळगाव, तुंगत, नारायण चिंचोली, ईश्वर वाठार व देगाव या गावांच्या सरपंच व ग्रामसेवक यांना पाटबंधारे विभागाने लेखी कळविले आहे. कुठलीही जीवित हानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सध्या कालव्यातून तलावात पाणी सोडणे बंद केले आहे. तलावात ८५ टक्के पाणीसाठा झाला, तर सांडवा उघडावा लागतो. त्यामुळे कुठलीही जीवित हानी व नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित गावच्या सरपंच, ग्रामसेवकांना लेखी कळविले आहे.
देवेंद्र दिघे, सहाय्यक अभियंता पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Production: सोयाबीन लागवड, उत्पादन घटणार

Onion Storage Capacity: कांद्याची साठवणूक क्षमता वाढविण्याची केंद्राकडून तयारी

Wheat Arrival : लासलगाव बाजार समितीमध्ये गव्हाची उच्चांकी आवक

Monsoon Forecast 2026: यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra Weather: उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT