
Pune News : जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १३० मिलिमीटर पाऊस पडला. धरणांतील पाण्याच्या आवकेत वाढ झाली आहे. सोमवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यातील एकूण २६ धरणांमध्ये २१.६१ टीएमसी एवढ्या नव्याने पाण्याची आवक झाली आहे.
त्यामुळे २४ धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, पाण्याचा मुठा, पवना, आरळा, भीमा, इंद्रायणी, भामा, कऱ्हा, नीरा, कुकडी, घोड, हंगा या नद्यांना विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवस पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. यामुळे धरणातील पाण्याच्या आवकेत काही प्रमाणात घट झाली होती. चालू महिन्यात दोन ऑगस्ट रोजी धरणातील पाण्याच्या आवकेत चांगलीच घट झाली होती.
त्यानंतर १८ ऑगस्टपासून पुन्हा राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यांत विविध भागांत जोरदार पाऊस पडू लागला असून धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पुन्हा पावसास सुरुवात झाल्याने धरणांत आवक वाढू लागली. मागील दोन दिवसांत चांगलीच वाढ झाली असून रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये १२.३३ टीएमसी, तर सोमवारी २१.६१ टीएमसी एवढी आवक झाली आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये मुठा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. यामध्ये टेमघर १३० मिलिमीटर, वरसगाव ९२, पानशेत ९३ मिलिमीटर आणि खडकवासला ३२ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणांत नव्याने ४.०० टीएमसी एवढ्या नव्याने पाणीसाठ्याची आवक झाली आहे.
नीरा खोऱ्यातील धरणक्षेत्रातही पावसाचा जोर बऱ्यापैकी होता. त्यामुळे पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर आणि वीर धरण क्षेत्रात कमी-अधिक पाऊस झाला.
यात वडिवळे धरणक्षेत्रात १२८ मिलिमीटर, तर नीरा देवघर १२०, पवना १०३, तर भाटघर धरणक्षेत्रात ८२ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे या खोऱ्यातील धरणांत ६.५१ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी होता. त्यामुळे पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, चिल्हेवाडी या धरणांत नव्याने १.९७ टीएमसी, तर मुळशी धरणांमध्ये १.२६ टीएमसी, उनीत ६.३७ टीएमसी एवढा नव्याने पाणीसाठा दाखल झाला आहे.
सोमवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणांतून सुरू असलेला विसर्ग (क्युसेकमध्ये)
टेमघर १५४८, वरसगाव ६९२५, पानशेत ८९२०, खडकवासला ३२,८२४, पवना ५७२०, कासारसाई ९००, चासकमान ५४५०, भामा आसखेड ६२०, आंध्रा १८६१, वडिवळे १३७६, शेटफळ २०८०, नाझरे ८३८, गुंजवणी २४४९, भाटघर ११,४३१, नीरा देवघर १२,०६०, वीर ७३,१९९, येडगाव १२००, वडज ३००, डिंभे ५५००, चिल्हेवाडी २०००, घोड ६८९०, विसापूर ६७५, उजनी ७३,३५५, मुळशी १०,१३७.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.