Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : विहिरी, कूपनलिका आटल्याने कांदा पिकात सोडली जनावरे

Agriculture Irrigation : गाव शिवारातील अनेक विहिरी कोरड्याठाक झाल्याने शेतकऱ्यांना दोन ते अडीच महिन्याच्या झालेल्या कांदा व इतर पिकात जनावरे सोडल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

Team Agrowon

Nashik News : सटाणा तालुक्यातील पिंपळदर गाव परिसरात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शिवारातील पाण्याचे स्रोत विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटू लागल्याने शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेली पिके सोडल्याचे चित्र आहे.

गाव शिवारातील अनेक विहिरी कोरड्याठाक झाल्याने शेतकऱ्यांना दोन ते अडीच महिन्याच्या झालेल्या कांदा व इतर पिकात जनावरे सोडल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. चालू वर्षी तीळवन, निरपूर, खमताने, पिंपळदर या भागांत डोंगररांगांना लागून क्षेत्रात पर्जन्यमान कमी राहिल्याने या भागातील छोटे मोठे तलाव, नाला बांध पावसाळ्यात देखील कोरडे राहिले.

त्यामुळे या भागातील कूपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट होती. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी पुरेल या आशेवर कांद्याची लागवड केली होती.

मात्र सध्या पाण्याची पातळी प्रचंड खालावल्याने अनेक शेतकऱ्यांनी दोन ते अडीच महिन्यांची कांदा पिकांमध्ये जनावरे सोडून दिली आहेत. पिंपळदर येथील शेतकरी अंबर रामा पवार यांनी आपला दोन ते अडीच एकर कांदा पिकात मेंढ्या सोडून दिल्या आहेत. शासनाने दुष्काळ जाही करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT