Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : दर पडल्याने शेतकऱ्याने होळी दिवशीच पेटवला कांदा

कांद्याच्या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डोंगरे यांनी टोकाचे पाऊल उचले आहे.

Team Agrowon

Nashik Onion News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे दर (Onion Rate) कोसळल्याने संताप व्यक्त करत आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांदा पेटवून देत संताप व्यक्त केला. ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता डोंगरे यांनी कांदा पेटवून दिला.

कांद्याच्या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डोंगरे यांनी टोकाचे पाऊल उचले आहे. डोंगरे यांनी शेतात सहकुटुंब एकत्र येत होळीचे औचित्य साधून दीड एकर क्षेत्रावरील कांद्याची होळी केली.

बाजारात कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. यावेळी डोंगरे यांच्या शेतात शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महिलांचा सक्रिय सहभाग यावेळी पाहायला मिळाला.

डोंगरे म्हणाले की, "गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कांदा अग्निडाग समारंभाची पत्रिका सोशल मीडियावर टाकली होती. ती प्रचंड व्हायरल झाली. राज्यातील मंत्र्यांपर्यंत ती निमंत्रण पत्रिका पोहचली असतानाही त्यांना याची दखल घेतली नाही.

मुख्यमंत्री साहेबांनाही या कार्यक्रमासाठी बोलवले होतं, पण त्यांना सत्तासंघर्षातून वेळ मिळाला नाही. राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकरी जगाला काय मेला काय केंद्र-राज्य सरकारला देणंघेणं नाही."

"आज राज्यात कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. कांदा बाजारात नेला तर शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे माझ्यावर कांदा जाळण्याची वेळ आली.

केंद्र-राज्य सरकारचने दखल घेतली नाही. नाफेड खरेदीही शेतकरी विरोधी आहे. ती ग्राहकांसाठी काम करते," अशी संतप्त भावनाही डोंगरे यांनी यावेळी व्यक्त केली.

शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी अग्निडागची पत्रिका सोशल मीडिया टाकली होती. त्यामध्ये ६ मार्चला होळीचे औचित्य साधून कांदा अग्निडाग करण्याचे जाहीर केले होते.

कांद्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अग्निडागचे आमंत्रण डोंगरे यांच्याकडून देण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Fishermen Compensation: पूरग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना चार कोटींची भरपाई मंजूर

CPIM Protest: बीड जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Crop Loan Rates: पीकनिहाय कर्जदर निश्चित

Sugarcane Payments Pending: साखर कारखान्यांकडे अडकले शेतकऱ्यांचे ८७६ कोटी रुपये

Jowar Prices Low: ज्वारीला कमी दर; शेतकरी आर्थिक अडचणीत

SCROLL FOR NEXT