Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : मागण्या बेदखल केल्याच्या निषेधात आता सोमवारपासून अन्नत्याग

Soybean Procurement : सोयाबीनची खरेदी नाफेडमार्फत सुरू केली जावी या प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी तीन दिवसांपासून मूर्तिजापूर येथे साखळी उपोषण सुरू केले आहे.

Team Agrowon

Akola News : सोयाबीनची खरेदी नाफेडमार्फत सुरू केली जावी या प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी तीन दिवसांपासून मूर्तिजापूर येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. या काळात प्रशासनाकडून मागणीला बेदखल केले जात असल्याचे दिसून आल्याने आता शेतकरी आक्रमक झाले असून, सोमवार (ता. ९)पासून संपूर्णपणे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. याबाबत शुक्रवारी (ता. ६) प्रशासनाला इशारावजा निवेदन दिले आहे.

मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात शेतकऱ्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. बाजारपेठेत सोयाबीनला हमीभावाएवढाही दर मिळत नसल्याने नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी त्वरित सुरू व्हावी या व अन्य मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत.

साखळी उपोषणाला तीन दिवस लोटले तरी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी या मागणीची दखल घेतली नाही. साखळी उपोषणकर्त्यांसोबत कुठलाही संवाद साधलेला नाही, चर्चा केली नाही. वास्तविक मूर्तिजापूर तहसीलदारांनी या आंदोलनाबाबत जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मार्केटिंग अधिकारी व नाफेडच्या व्यवस्थापकांना या आंदोलनाच्या अनुषंगाने २६ आॅगस्टला पत्रव्यवहार करीत अवगत केले होते.

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तातडीने तोडगा काढावा असे सुचवले होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले.

त्यामुळे शेतकरी मंडळाचे अध्यक्ष व या आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेले राजू वानखडे हे सोमवार पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. या आंदोलनस्थळी सोमवारी हजारो शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाडी व ट्रॅक्टरसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT