Koyna Dam agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam : मुख्यमंत्र्याच्या सूचनेनुसार कोयना धरणातून विसर्ग सुरू

Agriculture Irrigation : सातारा, सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे हे प्राधान्य असून याबाबत शासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा, सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे हे प्राधान्य असून याबाबत शासनस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता. २४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी तातडीने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. दरम्यान शुक्रवारी दुपारी एक वाजता पायथा वीज गृहातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मुंबई येथे शुक्रवारी (ता.२४) मंत्रालयात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोयना जलाशयातील पाणीसाठा वापराबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशान्वये सांगली आणि सातारा जिल्ह्यातील उर्वरित भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारीधरणातून १०५० क्युसेस क्षमतेने २ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात आले आहे. हे पाणी सांगली जिल्ह्याला पोहोचण्यासाठी दीड ते दोन दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. एकूण जलाशयाच्या प्रमाणात २५ टक्के पाणीसाठा कमी आहे.

कोयना धरणातील ६७ टक्के पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्यात येते. यावर्षी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, शेतीसाठी पाणी देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाणी कमी केल्यानंतर किती वीज विकत घ्यावी लागेल याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

आमदार अनिल बाबर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी प्रशांत मयेकर, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगिरी, मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, एमएलडीसीचे कार्यकारी संचालक शशांक जवळकर, मुख्य अभियंता चोपडे, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी बैठकीस उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT