Mango Market Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Market : आवक वाढल्याने आंब्याचे दर गडगडले ; बागायतदारांना स्थानिक बाजारपेठेचा आधार

Mango Season : यंदाच्या हंगामातील आंबा बाजारात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे

Team Agrowon

Pune News : यंदाच्या हंगामातील आंबा बाजारात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. बहुतांश शेतकरी नवी मुंबईच्या वाशी बाजारात आंबा पाठवत आहे. मात्र, आवक वाढल्याने गेल्या चार दिवसांत वाशी बाजारात आंब्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी स्थानिक बाजारातच आंबा विक्री करण्यावर भर देताना दिसत आहेत.

रत्नागिरी बाजारात कच्चा आणि पिकलेला असा दोन्ही आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. शहरातील छोट्या आणि स्थानिक बाजारपेठेत सध्या आंब्याची विक्री सुरू आहे.

बारीक फळाला ८०० रुपये तर मोठ्या फळासाठी एक हजार रुपये डझन असा दर मिळत आहे. पिकलेला आंबा मात्र १२०० ते १३०० रुपये दराने विक्री केला जात आहे.

सध्या रमजानचे दिवस सुरू असल्याने आंब्याला मागणी वाढली आहे. रत्नागिरी हापूस प्रमाणेच कर्नाटकातील केशर आंबाही विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाला आहे. या आंब्याची १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

जिल्ह्यात विक्री व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्याने आणि येथील आंबा बागायतदारांना वाशी मार्केटचाच आधार असल्याने त्यांना वाशी बाजारावर अवलंबून रहावे लागते. मात्र, वाशी बाजारात सध्या आंबा आवक वाढल्याने दर काही प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे काही बागायतदारांनी स्थानिक बाजारपेठेचा आधार घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Alert: माॅन्सूनचा ६ व्या दिवशीही मुक्काम; विदर्भात उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा अंदाज

Crop Damage Compensation Demand: वादळग्रस्त केळी उत्पादकांना तातडीची मदत द्या : किरण चव्हाण

Banana Crop Damage: वादळी वाऱ्याने केळी बाग उद्ध्वस्त

ABHA Card Scheme: एका कार्डवर मिळणार संपूर्ण आरोग्याची माहिती; पाहूयात सरकारची ABHA कार्ड योजना व अर्ज प्रक्रिया

Agriculture Solar Pump: आठ महिन्यांपासून सौर कृषिपंपांची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT