Mango Market : बैंगनपल्ली आंबा ६० ते १०० रुपये प्रतिकिलो

Mango Rate : विदर्भात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहे.
Mango
Mango Agrowon

Nagpur News : विदर्भात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेशातून येणाऱ्या आंब्यांची आवकही कळमना फ्रूट बाजारात घटलेली आहे.

Mango
Hapus Mango : यंदा फळांचा राजा स्वस्त, हापूसची मार्केटमध्ये मोठी रेलचेल

सध्या रोज बैंगनपल्ली आंब्याच्या दीड ते २ हजार क्रेट विक्रीसाठी येत आहे. गुणवत्तेनुसार भाव प्रतिकिलो ६० ते १०० रुपयांपर्यंत आहेत. सध्या केवळ बैंगनपल्ली आंब्याची आवक आहे.

Mango
Mango Market : पुण्यात रत्नागिरी हापूसच्या दोन हजार पेट्यांची आवक

आंध्र प्रदेशात दर वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाअभावी आंब्याचे उत्पादन २० ते २५ टक्के कमी राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून सुरू झालेली आवक मेपर्यंत राहील. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी आंब्याची आवक आहे. कळमन्यात भाव ६० ते १०० रुपये किलो असून किरकोळ बाजारात १०० ते १५० रुपये किलोने विकले जात आहे.

विदर्भात आंध्र प्रदेशच्या बैंगनपल्ली आंब्याची सर्वाधिक आवक होते. पण यंदा थोडा उशीरच झाला आहे. या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याची आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील. विदर्भासह अनेक राज्यात गारपिटीमुळे आंब्याचा बार झडला आहे. त्यामुळे यंदा २० ते २५ टक्के आवक कमी राहील. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमीच आहे.
- आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फ्रूट अडतिया असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com