Popatrao Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Development : शेती आणि ग्रामविकासाचे व्यासपीठ

Article by Popatrao Pawar : गावांसाठी तसेच शेती, जलसंधारण, ग्रामविकासासाठी ॲग्रोवन हे हक्काचं व्यासपीठ आहे. अगदी पहिल्या अंकापासून मला या दैनिकाने जागा दिली.

Team Agrowon

पोपटराव पवार

Rural Development : हिवरे बाजार, राळेगणसिद्धी यांसारख्या गावांनी देशात आदर्श काम केले. त्याचा कित्ता गिरवत अनेक गावे पुढे आली, विकास साधला. अशा गावांसाठी तसेच शेती, जलसंधारण, ग्रामविकासासाठी ॲग्रोवन हे हक्काचं व्यासपीठ आहे. अगदी पहिल्या अंकापासून मला या दैनिकाने जागा दिली.

राज्यात आणि देशात काम करायला प्रेरणा दिली. शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयांना मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये पूर्वी फारसे स्थान मिळायचे नाही. ती उणीव या दैनिकाने भरून काढली. अल्प भूधारक पण वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या धाडसी, प्रयोगशील शेतकऱ्यांची दखल या दैनिकाने घेतली. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, फळबागा, पाणी व्यवस्थापन, बाजारभाव, नवीन संशोधन, तंत्रज्ञान, देश-विदेशांतील शेती, क्लायमेट चेंज आदी विषय हाताळणारे हे एकमेव दैनिक आहे.

महाराष्ट्रात ग्रामविकासामध्ये ग्रामपंचायती व सरपंचांचे मोठे योगदान आहे. खरं तर सरपंच कोणत्याही पक्षाचा नसतो. या सरपंचांना कृषिकेंद्रित ग्रामविकासाची दृष्टी मिळावी यासाठी हे दैनिक सरपंच परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी राज्यातील सुमारे एक हजार सरपंचांना व्यासपीठ उपलब्ध करुन देते.

पहिल्या सरपंच परिषदेपासून प्रत्येक परिषदेत मी महाराष्‍ट्रातील सरपंचाशी संवाद साधायला असतो. आमच्या सारख्यांना एवढी मोठी संधी या दैनिकामुळे मिळाली. मुळात सरपंच परिषदेचा पायाच हिवरे बाजारमध्ये रचला असे मी म्हणेन. सरपंच परिषदेत झालेल्या अनेक ठरावांची नंतर राज्य सरकारला अंमलबजावणी करावी लागली.

शेतीच्या कथा आणि व्यथा या दैनिकाने सातत्याने प्रभावीपणे मांडल्याच, पण त्याच बरोबर जलसंधारण आणि ग्रामविकासात मोठे योगदान दिले. आदर्श गाव योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या दैनिकाची मोठी मदत झाली. हिवरे बाजारमधील प्रत्येक उपक्रम, घटना-घडामोडी, अनेक यशकथांची या दैनिकाने दखल घेतल्यामुळे त्यांची माहिती सर्वदूर पोहोचली.

येथील लोकसहभागातून होणारी कामे, पाण्याचा ताळेबंद, पीक पद्धती इत्यादी विषय राज्यभर गेले. विशेष म्हणजे ग्रामविकासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावांच्या यशकथा नियमित प्रकाशित होतात. त्यासाठी स्वतंत्र सदर सुरू आहे.

सकाळ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गावे जलसमृद्ध झाली आहेत. केवळ वर्तमानपत्राच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एक काम उभं राहिलं आहे. शेती आणि ग्रामविकासासाठी झटणाऱ्या प्रत्येक माणसाचं या दैनिकाशी नातं तयार झालं आहे. हे दैनिक खऱ्या अर्थाने वाटाड्या ठरलं आहे.

(शब्दांकन : सूर्यकांत नेटके)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT