Vipassana Sadhana Agrowon
ॲग्रो विशेष

Vipassana Sadhana : जगण्याची कला...विपश्यना साधना

टीम ॲग्रोवन

खूप वर्षांपासून ध्यानसाधनेबद्दल (Dhyan Sadhana) उत्सुकता होती. २०१९ साली ध्यानाचं सत्य, खरं स्वरूप विपश्यनेसारख्या (Vipassana Sadhana) अनमोल अशा साधनेमुळं हळूहळू लक्षात यायला लागलं. स्वतःच्या संवेदनांना चांगलं-वाईट लेबल न लावता, संवेदनांचा स्वीकार करून, प्रतिकार न करता समतेनं, तटस्थ भावनेनं फक्त ती अनुभवणं म्हणजेच ध्यान, विपश्यना! विपश्यना साधना ही भारताची अति प्राचीन आध्यात्मिक विद्या आहे.

भगवान बुद्धांनी सुमारे २५०० वर्षांपूर्वी तिचे पुनर्संशोधन केले. या परंपरेचे विख्यात आचार्य सयाजी ऊ. बा. खीन यांनी १९६९ मध्ये श्री. सत्यनारायणजी गोयन्का यांना आचार्यपद सोपवले आणि यांच्या प्रयत्नांनी भारताबरोबर ऐंशीहून अधिक देशातही विपश्यना साधनेचा लाभ मिळू लागला आहे. इगतपुरी येथे आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र आहे.

गुरुजींच्या प्रवचनातून लक्षात येतं की, सजगता आणि मनाची समता हीच विपश्यना आहे. जेव्हा या दोन्हींचा एकत्र अभ्यास होतो, तेव्हाच आपण दुःखमुक्त होतो. विपश्यना साधनेमुळे आयुष्यात कसाही प्रसंग येवो, त्याकडे स्थिरतेनं बघण्याची सवय मनाला लागते. नश्वर गोष्टींबाबत आसक्ती आपण धरतो. तृष्णा, आसक्ती सर्व प्रकारच्या दुःखाचं कारण आहे. जवळची व्यक्ती मृत्यू पावल्यामुळे खोलवरच्या आसक्तीने दुःख होतं. आयुष्यात सतत आपल्या वाट्याला अनुकूलता येईल असं नसतं.

कित्येकदा प्रतिकूल परिस्थितीला निडरपणे सामोरं जावं लागतं. कुठलीही ध्यानसाधना ही साबणाचं काम करत असते. आपल्या मनातील मळ काढण्याचं काम ती करत असते. विपश्यना ही एक साधना आहे. ती वाचून, ऐकून, सांगून समजत नाही तर ती प्रत्यक्ष अनुभवल्यावर आणि त्याचा सराव केल्यावर उमगत जाते. प्रत्येकाला आपल्या मनात डोकावून पाहण्यासाठी विपश्यनेसारखा गतिरोधक अनुभवायला मिळाला तर विकारमुक्त, दुःखमुक्त होण्यास मदत होते.

कोणतीही ध्यानधारणेची साधना ही स्वतःसाठी, शांतीपूर्ण आणि आनंदी, स्थिर जगण्यासाठी खूप आवश्यक असते. आपण तितका वेळ त्यासाठी दिला तर, आपल्या आयुष्याचे नंदनवन होतं. जन्माला आल्यापासून मनुष्य सारखा पळत असतो. पळताना तो सारासार विचार करून जगत नाही.

आनंद, सुख मिळालं, मनाप्रमाणे घडलं तर उतावीळ होऊन वागतो. दुःख, उदासीनता मिळाली, मनाप्रमाणे नाही घडलं तर व्याकुळतेने वागतो. आयुष्य संपतं पण उतावीळपणा आणि व्याकुळता संपत नाही. ती मानवी मनाला चिकटलेली कीड आहे. त्या किडीला मुळापासून नष्ट करायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी विपश्यना करावी आणि त्याप्रमाणे सराव करत जगावं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update : मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात

Paddy Crop : भोर तालुक्यात आंबेमोहोरचे पीक बहरले

Ginning Industry : ... अन्यथा जिनिंग उद्योग संपून जाईल

Horticulture Production : देशातील फलोत्पादन उत्पादनात ०.६५ टक्के घट

Shaktipith Highway : शक्तिपीठ महामार्ग सरकार रेटणार

SCROLL FOR NEXT